
नांदेड – नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी तांडा येथे एका पती-पत्नीच्या मृत्यूने खळबळ उडाली. चुलत भावाच्या लग्नासाठी माहेरी आलेल्या पत्नीचा गळा चिरून पतीने खून केला. नंतर त्यानेही गळफास घेऊन आत्महत्या केली. पायल विनोद राठोड या २७ वर्षीय विवाहितेचा पती विनोद राठोड याने खून केला.
पायल राठोड या आपल्या चुलत भावाच्या लग्नासाठी पती आणि तीन मुलांसह माहेरी बोरगडी तांडा येथे आल्या होती. ११ मेच्या रोजी रात्री पायल आणि विनोद या पती-पत्नीमध्ये काही कारणातून वाद झाला. यातून विनोद याने धारदार शस्त्राने पत्नी पायलचा गळा चिरून खून केला आणि रात्रीच तो फरार झाला. दुसऱ्या दिवशी १२ मे रोजी धानोरा शिवारात विनोद याचाही एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. या दांपत्याला दोन मुली आणि एक आठ महिन्याचा मुलगा आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहेत.



