
नांदेड – विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार जागृतीच्या संदर्भाने स्वीप कार्यक्रमांतर्गत अवर सचिव तथा उपमुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या सूचनेनुसार ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता मतदार जनजागृती कार्यक्रमाची राज्यस्तरीय लॉन्चिंग मुंबई येथे झाली आहे. नांदेडमध्येही जिल्हा प्रशासन व नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका यांच्या वतीने जिल्हास्तरीय मतदार जागृती आणि शपथ घेण्याचा कार्यक्रम शुक्रवारी संपन्न झाला.
शहरातील व्हीआयपी रोडवरील तिरंगा ध्वज कॉर्नरवर एका भव्य कार्यक्रमात केंद्रीय निवडणूक निरीक्षक वीर बाला मायादेवी, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी उपस्थित जनसमुदायाला मतदानाची शपथ दिली. यावेळी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वराडे, शिक्षणाधिकारी माधव सलगर, दिलीप बनसोडे, नांदेड शहर वाघाळा महानगरपालिकेचे उपायुक्त अजितपालसिंघ संधू, ज्येष्ठ नागरिक अशोक तेरकर, उपायुक्त सुप्रिया टवलारे, प्रभारी उपायुक्त संजय जाधव, मनीषा नरसाळे, सहाय्यक आयुक्त गुलाम सादिक, शिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी, विभाग प्रमुख प. ला. आलूरकर, सदाशिव पतंगे, मिर्झा बेग, निलावती डावरे, रावण सोनसळे, रमेश चवरे हे उपस्थित होते.यावेळी शाहीर रमेश गिरी आणि साहेबराव डोंगरे यांच्या संचाने मतदान जागृतीची गीते सादर करून उपस्थित यांचे प्रबोधन केले. या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते सेल्फी पॉईंट आणि मी मतदान करणारच या स्वाक्षरी फलकाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी तरुण मतदार आणि दिव्यांग मतदार यांच्या पहिल्यांदा स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महानगरपालिकेचे साईराज मुदिराज, संदीप लबडे, संजय ढवळे, आशा घुले, सारिका आचमे, माणिक भोसले, आदींनी परिश्रम घेतले. यावेळी शहरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.