
नांदेड – राज्यातील ३२ जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यात ६५ गटांमध्ये निवडणूक होणार असून या प्रत्येक गटामध्ये दोन पंचायत समितीचे असे एकूण १३० गण निवडले जाणार आहेत. नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक ७ गट मुखेड तालुक्यात राहतील तर किनवट, हदगाव, लोहा आणि कंधार या तालुक्यात प्रत्येकी ६ गटांचा समावेश करण्यात आला आहे. या गटांची रचना आता करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात येणार आहे. जिल्ह्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला वेग येणार आहे. प्रशासनाकडून होणाऱ्या या प्रभाग रचना, वॉर्ड रचना, गट आणि गण रचनेकडे आता इच्छुकांचे लक्ष लागले आहे.
२०११ च्या जनगणनेनुसार ही निवडणूक होणार आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्याची ग्रामीण लोकसंख्या ही २४ लाख १६ हजार १८४ इतकी आहे. त्यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या ही ४ लाख ७७ हजार २३ आणि अनुसूचित जमातीची लोकसंख्या २ लाख ४० हजार २७४ इतकी आहे. या लोकसंख्येवर आधारित गट आणि गण रचना तयार करून त्याबाबतचे आरक्षणही निश्चित केले जाणार आहे.
जिल्हा परिषद क्षेत्राचे निवडणूक विभागामध्ये आणि पंचायत समीक्षक समिती क्षेत्राचे निर्वाचन गणांमध्ये विभाजन करणे, त्यांच्या सीमा निश्चित करून त्यांचे प्रारूप तयार करणे याची जबाबदारी जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी प्राधिकृत केलेला तहसीलदार अशा अधिकाऱ्याकडे ही जबाबदारी राहणार आहे. निर्वाचक गणरचनेचे प्रारूप जिल्हाधिकारी प्रसिद्ध करतील. निवडणूक विभाग आणि निर्वाचक गण रचनेच्या प्रारूपावरील हरकती आणि सूचना जिल्हाधिकारी किंवा तहसीलदार दर्जापेक्षा कमी नाही असे अधिकारी स्वीकारतील. जिल्हा परिषद क्षेत्राचे निवडणूक विभाग आणि पंचायत समिती क्षेत्राचे निर्वाचन यासंबंधी प्रारूप प्रसिद्धीनंतर प्राप्त झालेल्या हरकती आणि सूचनावर सुनावणी घेऊन राज्य निवडणूक आयोगाने किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याने मान्यता दिल्यानंतर जिल्हा परिषद क्षेत्राचे निवडणूक विभाग आणि पंचायत समिती क्षेत्राचे निर्वाचक गण अंतिम करण्याची जबाबदारी विभागीय आयुक्तांकडे राहणार आहे. त्याचवेळी जिल्हा परिषद निवडणूक विभाग आणि पंचायत समिती निर्वाचक गणाची अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध जिल्हाधिकारी प्रसिद्ध करतील. हे सर्व आदेश राज्याचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी दिले आहेत.
नांदेड जिल्ह्यात असे राहतील गट आणि गण …नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यात दोन गट आणि चार गण राहतील तर किनवट तालुक्यात ६ गट आणि १२ गण, हिमायतनगर तालुक्यात २ गट, ४ गण, हदगाव तालुक्यात ६ गट,१२ गण, अर्धापूर तालुक्यात ३ गट, ६ गण, नांदेड तालुक्यात ५ गट, १० गण, मुदखेड तालुक्यात २ गट, ४ गण, भोकर तालुक्यात ३ गट, ६ गण, उमरी तालुक्यात २ गट,४ गण, धर्माबाद तालुक्यात २ गट, ४ गण, बिलोली तालुक्यात ४ गट, ८ गण, नायगाव तालुक्यात ४ गट, ८ गण, लोहा तालुक्यात ६ गट, १२ गण, कंधार तालुक्यात ६ गट, १२ गण, मुखेड तालुक्यात ७ गट, १४ गण आणि देगलूर तालुक्यात ५ गट आणि १० गणांचा समावेश राहणार आहे.




Very good article. I absolutely appreciate this site. Thanks!
Also visit my page … y2mate.ws