Uncategorizedसांस्कृतिक

नांदेडमध्ये बंदाघाटच्या रम्य काठावर रविवारपासून फुलणार दिवाळी पहाट..!

आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त दर्जाच्या गायिका मृदुला दाढे, सुप्रसिद्ध गायक अमोल चव्हाण यांची संगीतमैफल रंगणार, कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण छोटे उस्ताद या गायन स्पर्धेची उपविजेती वीरा हाक्के..!

नांदेड – दुःखालाही चिमटीमध्ये धरता येते, अन तयाचे फुलपाखरू करता येते या सकारात्मकतेने गेल्या १३ वर्षापासून चालू असलेल्या दिवाळी पहाट उपक्रमाचा भाग म्हणून यावर्षीही बंदाघाट येथे ८ व ९ नोव्हेंबर रोजी दिवाळी पहाटचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षीची आवर्षण परिस्थिती बघता सदर दिवाळी पहाट कार्यक्रमाच्या नेहमीच्या उपक्रमात कपात करून सायंकाळचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. अत्यंत साधेपणाने व दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी संवेदना असलेला हा कार्यक्रम होणार  आहे.

दिवाळी पहाट अंतर्गत ८ नोव्हेंबर रोजी सकाळी ५.३० वा.गुरुद्वारा बोर्ड, नागरी सांस्कृतिक समिती आणि अशोक नगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने डॉ.नंदकुमार मुलमुले निर्मित व त्यांचे खुमासदार निवेदन असलेल्या तसेच आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त दर्जाच्या गायिका मृदुला दाढे यांच्या सुश्राव्य संगीतमैफल ‘सूर दीपावली’ चे आयोजन करण्यात आले आहे. यात सुप्रसिद्ध गायक अमोल चव्हाण मुंबई, यांचा सहभाग असून साथ संगत सिंथ:अरविंद इनामदार मुंबई, तबला: राहुल चौगुले मुंबई व इतर यांची असणार आहे.

दिनांक ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ५.३० वाजता ‘ऋतूंचे रंग, सणांचे तरंग’ या पत्रकार विजय जोशी निर्मित संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. संकल्पना एडवोकेट गजानन पिंपरखेडे तर निवेदन कवी बापू दासरी यांचे असणार आहे. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण स्टार प्रवाहवरील गाजलेल्या छोटे उस्ताद या गायन स्पर्धेची उपविजेती वीरा हाक्के असणार असून, ती सणांवर आधारित गाणे सादर करणार आहे. संगीत संयोजन डॉ. प्रमोद देशपांडे यांचे आहे. अमोल मालेगावकर, माधुरी पाटील वाकोडकर, उन्मनीडुघरेकर(बोरीकर), अभिनव पाटील, गणेश हाक्के आणि विजय बंडेवार हे विविध गीते सादर करणार आहेत. साथसंगत तबला:गजानन कुलकर्णी, कृष्णा बोंपिलवार, सिंथ:गौतम डावरे व राज लांबटिळे, ढोलकी: रविराज भद्रे ऑक्टोपॅड: गौतम डावरे यांची असणार आहे.

या कार्यक्रमाच्या आयोजनात गुरुद्वारा बोर्ड, नागरी सांस्कृतिक समितीचे शंतनू डोईफोडे, बापू दासरी, ॲड. गजानन पिंपरखेडे, विजय जोशी, चारुदत्त चौधरी, विजय होकर्णे, उमाकांत जोशी, सुरेश जोंधळे, लक्ष्मण संगेवार,  वसंत मैय्या, विजय बंडेवार, डॉ.नंदकुमार मुलमुले, अशोकनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेचे आनंद जवादवार, गिरीश देशमुख यांनी परीश्रम घेतले आहेत. महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या या दिवाळी पहाट संगीत मैफिलीचा रसिकांनी आवर्जून लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!