प्रशासकीय

नांदेड पोलीस परिक्षेत्राचे नवे उपमहानिरीक्षक शहाजी उमाप

विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर यांची पुणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली 

नांदेड – बृहन्मुंबईच्या विशेष शाखेचे अपर पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांची नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश ९ जुलै रोजी पारित करण्यात आले आहेत. विद्यमान विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. शशिकांत महावरकर हे पुण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून आगामी काळात काम पाहणार आहेत.
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या २२ कलम २२ मधील तरतुदीनुसार भारतीय पोलीस सेवा दलातील अधिकाऱ्यांची नमूद पदावरून बदलीने पदस्थापना करण्यात आली आहे. त्यानुसार नांदेड पोलीस परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. शशिकांत महावरकर यांची पुण्याच्या गुन्हे अन्वेषण विभाग विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. त्याचवेळी बृहन्मुंबई विशेष शाखेचे अपर पोलीस आयुक्त शहाजी उमाप यांची नांदेड परिक्षेत्राच्या पोलीस उपमहानरीक्षकपदी डॉ. शशिकांत महावरकर यांच्या बदलीने रिक्त होणाऱ्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
नागपूर शहर दक्षिण प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त शिवाजी राठोड यांची शहाजी उमाप यांच्या बदलीने रिक्त होणाऱ्या बृहन्मुंबई विशेष शाखेच्या अप्पर पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
ठाणे शहराचे अप्पर पोलीस आयुक्त डी. टी. शिंदे यांची मीरा-भाईंदर वसई विरांर अप्पर पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तर ठाणे शहराचे अपर पोलीस आयुक्त संजय जाधव यांची अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग ठाणे शहर या पदावर बदली करण्यात आली आहे. मीरा-भाईंदर वसई विरारचे अपर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक यांची ठाणे शहराच्या अप्पर पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. राज्य राखीव पोलीस दलाच्या पोलीस उप महानिरीक्षकपदी असलेले अभिषेक त्रिमुखे यांची बृहन्मुंबईच्या अप्पर पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!