गुन्हेगारी

नांदेडमध्ये चाकूचा धाक दाखवत स्कूटी आणि १३ लाखांची सोन्याची बॅग लंपास 

जुन्या नांदेडातील सैदान मोहल्ला येथील घटना

नांदेड – जुन्या नांदेडातील सैदान मोहल्ला येथे सोने चांदीच्या कारागिराची स्कूटी आणि स्कुटीमध्ये असलेली १३ लाखांची सोन्याची बॅग लंपास केल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जुन्या नांदेडातील सैदान मोहल्ला येथील शेख सैदुल अब्दुल सोबान वय ३७ हे सोन्या चांदीचे सुवर्णकार (कारागीर) आहेत ते ७ जुलैच्या मध्यरात्री स्कूटी घेऊन एमएच २६ सीएफ २१६१ क्रमांकाची स्कूटी घेऊन बबुजान मज्जिद सैदान मोहल्ला जवळ आले असता दोघाजणांनी त्यांना चाकूचा धाक दाखवत जबरदस्तीने त्यांची स्कूटी आणि स्कुटीच्या डिकीमधील सोन्याची बॅग ज्यामध्ये १३ लाख ४८ हजार रुपयांचे सोने होते. ते घेऊन पळून गेले. याबाबत शेख सैदुल यांनी इतवारा ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून इतवारा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक गायकवाड हे करीत आहेत.

 जनजागृती रॅलीत खिसेकापूंनी पळवले रोख ६५ हजार…नांदेड येथे सोमवारी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांची जनजागृती रॅली होती. या रॅलीत सहभागी होण्यासाठी मुखेड तालुक्यातील पाळा येथील शंकर बालाजी डुमणे आणि शंकर भीमराव जमदाडे हे दोघे आले होते. तरोडा नाका येथे ते रॅलीत सहभागी झाले असता चोरट्यांनी डूमणे यांच्या खिशातील रोख २५ हजार तर लामदाडे यांच्या खिशातील ४० हजार रुपये लंपास केले. या प्रकरणी भाग्यनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!