Police

नांदेड पोलीस दलातर्फे तक्रार निवारण दिन; ४१० अर्ज निकाली

यापुढेही दर शनिवारी नांदेड पोलिसांकडून तक्रार निवारणाची मोहिम राबविण्यात येणार

नांदेड – जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना दर शनिवारी नागरिकांच्या तक्रार निवारणाच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी विशेष मोहीम राबविण्याबाबत आदेश दिले होते. त्यानुषंगाने शनिवारी राबविण्यात आलेल्या तक्रार निवारण मोहिमेत ४१० अर्ज निकाली काढण्यात आले. यात स्थानिक ३५ व वरिष्ठ ३७५ अर्जांचा समावेश होता.

नांदेड जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनमध्ये प्रलंबित प्रकार अर्जाची संख्या वाढली होती. सदर तक्रारीचा वेळेत अर्ज निकाली काढणे बंधनकारक असल्याने पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सर्व प्रभारी अधिकारी यांना सदर तक्रारी अर्ज तात्काळ निकाली काढण्यासाठी सूचना दिल्या होत्या. १८ जानेवारी रोजी जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन येथे तक्रार निवारणाची मोहिम राबविण्यात आली. त्यामध्ये जिह्यात स्थानिक ३५ व वरिष्ठ ३७५ अर्ज निकाली काढण्यात आले आहेत.

सदरची कामगिरी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेड, तसेच शहरातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी यांनी केली आहे. सदर कामगिरीबाबत पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी कौतुक केले आहे.

यापुढे दर शनिवारी नांदेड पोलिसांकडून तक्रार निवारणाची मोहिम राबविण्यात येणार आहे. सदर मोहिमेमध्ये पोलीस विभागाशी व इतर विभागाशी पोलीस स्टेशन येथे दिलेले अर्ज त्या विभागाचे संबधीत अधिकारी व कर्मचारी यांच्या समन्वयाने निकाली काढण्यात येणार आहेत. नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी त्यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने संबधीत पोलीस स्टेशन येथे जावून त्यांनी दिलेल्या तक्रारीचे निवारण करून घ्यावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी केले आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!