प्रशासकीय

नांदेड तालुक्यातील सरपंच पदाची आरक्षण सोडत एक जुलै रोजी होणार 

एकूण ७३ पदांपैकी ३७ पदे ही महिलांसाठी राखीव, २०२५ ते २०३० या वर्षासाठी सोडत पद्धतीने काढले जाणार आरक्षण

  • नांदेड – नांदेड तालुक्यातील ७३ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत एक जुलै रोजी होणार आहे. हे आरक्षण २०२५ ते २०३० या वर्षासाठी राहिल. १ जुलै रोजी सकाळी १० वाजता नांदेड तहसिल कार्यालय येथे नांदेड उपविभागीय अधिकारी न यांच्या बैठक कक्षात आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. सरपंच पदाच्या आरक्षणात नांदेड तालुक्यात एकूण राखीव ७३ पदांपैकी ३७ पदे ही महिलांसाठी राखीव पदे आहेत. सर्व संबंधीतानी तसेच माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी या आरक्षण सोडतीस उपस्थित रहावे, असे आवाहन नांदेडचे तहसिलदार संजय वारकड यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी यांच्या २३ जून २०२५ अधिसूचनेनुसार नांदेड तालुक्यातील बिगर अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकाचा मागास प्रवर्ग आणि स्त्रिया यांच्यासाठी राखून ठेवावयाची सरपंचाची पदे मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम १९६४ च्या नियम २ अ चे पोटनियम ३ व ४ अन्वये जिल्हाधिकारी नांदेड यांनी पुढील तपशिलानुसार अधिसूचीत करुन दिले आहे.

हे आरक्षण सन २०२५ ते २०३० मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी अंमलात राहील. सदर प्रवर्गाच्या सरपंच पदासाठी सोडत पद्धतीने तहसिल कार्यालय नांदेड येथे उपविभागीय अधिकारी नांदेड यांचे बैठक कक्ष, दुसरा मजला येथे मंगळवार १ जुलै रोजी सकाळी १० वाजता करण्यात येईल. सर्व संबंधीतानी उपस्थित रहावे असेही आवाहन तहसिलदार संजय वारकड यांनी केले आहे.

सरपंच पदाचे आरक्षण अनुसूचित जातीसाठी एकूण राखीव पद १८ त्यापैकी ५० टक्के महिलांसाठी राखीव ९, अनुसूचित जमाती १ पैकी महिलासाठी १, नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण राखीव पद २० पैकी महिलांसाठी १०, खुला प्रवर्ग एकूण राखीव पद ३४ पैकी ५० टक्के महिलांसाठी १७ राखीव ठेवण्यात आली आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!