नांदेड – मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राकडून नांदेड जिल्ह्यासाठी आज मंगळवारी रात्रीही रेड अलर्ट दिला आहे. यादरम्यान नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्ह्यात या काळात तुरळक ठिकाणी ताशी ४१ ते ६१ किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची तसेच विजेच्या कडकडाटासह, ढगांच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सलग दुसऱ्या दिवशी नांदेड जिल्ह्यासाठी हवामान खात्याने रेड अलर्ट दिला आहे. सोमवारी रात्री मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. जिल्ह्यात सोमवारी रात्री काही भागात दमदार पाऊस झाला.
Check Also
Close