नांदेड – नांदेड जिल्ह्यातील अवैध धंद्यावर नांदेड पोलीस परिक्षेत्राचे विशेष पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांचे करडी नजर असल्याचे स्पष्ट होत आहे. जुगार अड्ड्यांसह आता वाळू माफियांही उमापांच्या रडारवर आले आहेत. शनिवारी सायंकाळी विमानतळ आणि मुदखेड पोलीस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या अवैध वाळू उपशाविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. मुगट व ब्राह्मणवाडा शिवारातील हिरा घाटाजवळ ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
विमानतळ पोलिस ठाणे आणि मुदखेड पोलीस ठाणे हद्दीतील ब्राम्हणवाडा व मुगट येथील घाटावरुन मोठया प्रमाणावर अवैधरित्या वाळू उपसा, साठवणूक व वाहतूक होत असल्याची माहिती पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांना मिळाली. या माहितीवरून त्यांनी ब्राह्मणवाडा परिसरात एक पथक पाठविले. पोलीस ठाणे विमानतळ हद्दीतील मुगट व ब्राम्हणवाडा शिवारातील हिरा घाटजवळील वाळू धक्क्यावर कारवाई करत दोन टिप्पर, एक जेसीबी मशीन यासह नदीपात्रातून बाहेर काढून ठेवलेली ४० ब्रास वाळू असा एकूण ६१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलीस ठाणे विमानतळ येथे गुरनं 36/2026 कलम 303(2), 3(5), 48(7) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस ठाणे विमानतळ येथील पोहेकॉ संतोष राणे हे करीत आहेत.
हिरा घाटवरील कारवाईनंतर हे विशेष पथक पोलीस ठाणे मुदखेड हद्दीत मुगट शिवारातील वाळू धक्क्यावर कारवाई करत एक टिपर, एक जेसीबी मशीन यासह नदीपात्रातून बाहेर काढून ठेवलेली ३० ब्रास वाळू असा एकूण ४६ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलीस ठाणे मुदखेड येथे गुरनं 25/2026 कलम 303(2), 3(5) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मुदखेड ठाण्यातील पोहेकॉ अंगद कदम हे करीत आहेत. पोलीस ठाणे विमानतळ व मुदखेड हद्दीतील या दोन्ही कारवायांत विशेष पथकाने ३४ लाख रुपये किमतीचे तीन टिप्पर, ७० लाख रुपये किमतीच्या २ जेसीबी मशीनसह ३ लाख ५० हजार रुपये किंमतीची ७० ब्रास वाळू असा एकूण १ कोटी ७ लाख ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत ६ आरोपीतांना ताब्यात घेतले आहे.
या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराम माचेवाड यांचेसह पोहेकॉ प्रदिप खानसोळे, पोहेकॉ संजीव जिंकलवाड, पोकॉ गणेश धुमाळ व पोकॉ कामाजी गवळी यांनी सहभाग घेतला. पथकाच्या उल्लेखनीय कामगिरीबाबत पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी पथकातील अधिकारी व अंमलदारांना प्रशंसापत्र देऊन त्यांचे अभिनंदन केले आहे. नागरिकांनी आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती नजीकच्या पोलीस ठाण्यास अथवा पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाच्या nandedrange.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर किंवा 9150100100 या ‘खबर’हेल्पलाइनवर महिती देऊन अवैध व्यवसायांचा बिमोड करण्यासाठी आपला हातभार लावावा, असे आवाहन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.