
नांदेड – नांदेड पोलीस परिक्षेत्रातील उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस निरीक्षक अशा ७५ पोलीस अधिकाऱ्यांचा विहित कालावधी पूर्ण झाल्याने विनंती आणि प्रशासकीय कारणास्तव बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये ३७ पोलीस उपनिरीक्षक, २८ सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि १० पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे. संबंधित पोलीस अधीक्षकांनी या बदली आदेशाची प्रत पोलीस अधिकाऱ्यांना बजावून त्यांना तात्काळ कार्यमुक्त करावे, बदली झालेल्या अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करताना पर्यायी अथवा बदलीवर येणाऱ्या अधिकाऱ्यांची वाट पाहू नये, असे आदेशही पोलीस उप महानरीक्षक शहाजी उमाप यांनी दिले आहेत.
नांदेड पोलीस परिक्षेत्रातून २१ पोलीस उपनिरीक्षकांच्या विनंती बदल्या करण्यात आल्या आहेत तर १६ उपनिरीक्षकांची प्रशासकीय कारणास्तव परिक्षेत्रात इतर जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे. प्रशासकीय कारणास्तव बदली करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकांमध्ये नांदेड येथील आशिष बोराटे, दामिनी ननवरे, योगेश बोधगिरे, बाबू शिंदे, बालाजी नरवटे, राजेश जाधव, आयुब शेख आणि श्यामल देशमुख यांना कार्यरत ठिकाणी एक वर्षांची मुदतवाढ दिली आहे. भूषण कांबळे नांदेडहून हिंगोलीला, उमेश रायभोळे, आनंद बिचेवार, गोपाळ इंद्राळे यांची नांदेडहून लातूर, विश्वजीत रोडे यांची नांदेडहून परभणीला, महेंद्र कुमार पोपलवार यांची परभणीहून नांदेडला, नागनाथ पाटील यांची परभणीहून हिंगोलीला आणि संदीप यामावार यांची हिंगोलीहून नांदेडला प्रशासकीय कारणास्तव बदली करण्यात आली आहे.
पोलीस उप निरीक्षकांच्या २१ विनंती बदल्यामध्ये प्रकाश कुकडे यांची नांदेडहून परभणीला, अमर केंद्रे, मुक्तीराम येवले यांची नांदेडहून लातूरला, राम जगाडे, नारायण शिंदे यांची नांदेडहून परभणीला, रामधन डोईफोडे यांची परभणीहून लातूरला, विजय पंतोजी, सूर्यकांत काठोडे, भारत सावंत, सुदर्शन इंगोले, शंकरराव देशमुख, गौतम वाहुळे, प्रशांत जाधव, हेमंत देशपांडे, सचिन सोनवणे यांची परभणीहून नांदेडला, मुजाहिद शेख यांची परभणीहून लातूरला, मीनाक्षी राखोडे यांची परभणीहून हिंगोलीला, पुंडलिक मोहिते यांची लातूरहून परभणीला, टोपाजी कोरके यांची लातूरहून नांदेडला, मारोती सोनकांबळे यांची हिंगोलीहून नांदेडला आणि माजिद मोहम्मद यांची हिंगोलीहून परभणीला बदली करण्यात आली आहे.
परिक्षेत्रांतर्गत २८ सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये १८ प्रशासकीय तर १० विनंती बदल्यांचा समावेश आहे. विनंती बदल्यामध्ये बालाजी गायकवाड, अजिनाथ पाटील आणि मुंजाजी दळवे यांची नांदेडहून परभणीत तर नाना लिंगे यांची नांदेडहून लातूरला, मुख्तार सय्यद, कृष्णा घायवट आणि प्रभाकर कापुरे यांची परभणीहून लातूरला, नरसिंह आनलदास व विशाल वाठोरे यांची लातूरहून नांदेडला आणि बालाजी महाजन यांची हिंगोलीहून नांदेडला बदली करण्यात आली आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या प्रशासकीय बदल्यामध्ये संजय निलपत्रेवार, दुर्गा बारसे, संकेत दिघे, महादेव पुरी, राजू वटाणे, संदीप बोरकर, भाऊसाहेब खंदारे, प्रवीण राठोड आणि भीमाशंकर गायकवाड यांना कार्यरत जिल्ह्यात एक वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे. शंकर डेडवाल यांची नांदेडहून हिंगोलीला, श्रीनिवास राठोड, भालचंद्र तिडके व संतोष केदासे यांची नांदेडहून लातूरला, प्रभाकर कवाळे, नरसिंग पोमनाळकर, विक्रम हराळे यांची परभणीहून नांदेडला, दिपाली गीते यांची लातूरहून परभणीला आणि मो. रियाज शेख यांची लातूरहून नांदेडला बदली करण्यात आली आहे.
दहा पोलीस निरीक्षकांच्या बदल्यामध्ये तीन बदल्या या प्रशासकीय कारणावरून आहेत त्यामध्ये नामदेव रिठे यांची नांदेडहून परभणीला संजीवन मिरकले यांची लातूर होऊन नांदेडला आणि गणेश कदम यांची लातूरहून परभणीला बदली करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षकांच्या विनंती बदल्यामध्ये विनोद मेत्रेवार व विश्वनाथ झुंजारे यांची नांदेडहून लातूरला, बालाजी मोहिते आणि बुद्धीराज सुकाळे यांची परभणीहून लातूरला चिंताभर कामठेवाड आणि सूर्यमोहन बोलमवाड यांची परभणीहून नांदेडला तर शरद मरे यांची परभणीहून हिंगोलीला बदली करण्यात आली आहे.
बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांनी विहित मुदतीत हजर न झाल्यास त्यांच्याविरुद्ध शिस्तभंग विषयक कारवाई सुरू करण्यात येईल असा इशाराही दिला आहे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना कार्यमुक्त केल्याचा आणि ते बदलीच्या घटकात हजर झाल्याचा अहवाल त्याच दिवशी ई ऑफिसद्वारे नांदेड परिक्षेत्र कार्यालयाला कळवण्याचे निर्देशही पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी दिले आहेत.