प्रशासकीय

भोकरचे नवे तहसीलदार आता विनोद गुंडमवार

हदगाव तहसीलचा पदभार सुरेखा नांदे यांनी स्वीकारला

नांदेड – आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार राज्य शासनाने सहा तहसीलदारांच्या बदल्या तसेच नियुक्ती केल्या आहेत. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील भोकरचे नवे तहसीलदार म्हणून विनोद गुंडमवार काम पाहणार आहेत. त्याचवेळी नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या तहसीलदार सुरेखा नांदे यांना हदगाव तहसीलदार पदाचा पदभार सोपवला असून त्यांनी शुक्रवारी आपला पदभार स्वीकारलाही आहे.

जिल्ह्यातील हदगाव येथे कार्यरत असलेले तहसीलदार विनोद गुंडमवार यांना भोकरचे तहसीलदार सुरेश घोळवे यांच्या बदलीने रिक्त होणाऱ्या पदावर नियुक्ती दिली आहे. भोकरचा पदभार आता विनोद गुंडमवार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. तर भोकरचे तहसीलदार सुरेश घोळवे हे आता बीड जिल्ह्यातील शिरूर कासार येथील रिक्त असलेल्या पदावर तहसीलदार म्हणून रुजू होणार आहेत.राज्यातील इतर तीन तहसीलदारांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये सुरेश वाघचौरे यांची नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी येथे, धनंजय देशमुख यांची लाखनी येथे आणि दत्तात्रय निंबाळकर यांची मौदा येथे बदली करण्यात आले आहे.

नांदेड जिल्ह्यातील नियुक्तीमध्ये समावेश असलेल्या विनोद गुंडमवार यांनी यापूर्वी देगलूर, बिलोली तसेच हदगावचे तहसीलदार म्हणून काम पाहिले आहे. तर सुरेखा नांदे यांनीही नायगाव येथे तहसीलदार म्हणून कर्तव्य बजावले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!