प्रशासकीय

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नांदेड विमानतळावर स्वागत

पोहरादेवीसाठी हेलिकॉप्टरने प्रस्थान, नांदेडमार्गेच मुंबईला रवाना होणार

नांदेड  :- बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी येथे नंगारा म्युझियम लोकार्पण व जाहीर सभेसाठी आज  ५ ऑक्टोबरला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे गुरूगोविंदसिंघजी विमानतळावर सकाळी १०.३० वाजता आगमन झाले.

गुरूगोविंदसिंघजी विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खा.अशोकराव चव्हाण, खा.अजित गोपछडे, आ.बालाजी कल्याणकर, आ.भीमराव केराम, आ.डॉ. तुषार राठोड, आ.राजेश पवार, पोलीस महासंचालक बिपीन कुमार सिंग, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्यासह मान्यवरांनी स्वागत केले. १०.३५ ला ते पोहरादेवीकडे रवाना झाले. पोहरादेवी येथे होणाऱ्या कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. पोहरादेवी येथील कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मान्यवर सहभागी होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पोहरादेवी येथील जगदंबा मंदिरात संत सेवालाल महाराज, संत रामराव महाराज यांच्या समाधी स्थळाचे ते दर्शन घेतील. बंजारा विरासत नंगारा म्युझियमचे ते लोकार्पण करतील. त्यानंतर  पोहरादेवी येथील जाहिर सभेमध्ये ते जनतेला संबोधित करतील. दुपारी १२.५५ वा. पोहरादेवी येथून प्रस्थान करून १.४५ वाजेच्या सुमारास नांदेड विमानतळावर त्यांचे आगमन होईल. त्यानंतर दुपारी १.५० ला नांदेड विमानतळावरून ते मुंबईकडे प्रयाण करणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!