
लोहा : तालुक्यातील दापशेड येथील पाच वर्षीय मुलीवर तिच्या नात्यातीलच नराधम आरोपीने तिच्यावर अत्याचार केला.ही घटना नात्याला माणुसकीला काळीमा फासणारी आहे. त्यामुळे या घटनेतील आरोपीला कठोरातील कठोर शासन करावे अशी मागणी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रणिताताई देवरे – चिखलीकर यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे. दापशेड येथील पीडितेच्या कुटुंबीयांची प्रणीताताई चिखलीकर यांनी भेट घेऊन त्यांना धीर दिला.
लोहा तालुक्यातील दापशेड येथील एका पाच वर्षीय चिमुकलीवर त्यांच्याच नात्यातील नराधमाने अत्याचार केला. या घटनेनंतर नातेवाईकांनी सोनखेड पोलीस ठाणे घालून गाठून गुन्हा दाखल केला होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक माने यांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अवघ्या पाच तासांत अटक केली. या घटनेची माहिती समजताच भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रणितताई देवरे – चिखलीकर यांनी दापशेड येथे जाऊन पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांना मानसिक धीर दिला. सोनखेड पोलीस ठाण्यात जाऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक माने यांच्याशी सविस्तर चर्चा करून आरोपीला कठोरातील कठोर शासन झाले पाहिजे, या अनुषंगाने कारवाई करावी, हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फासावर लटकवावे अशी मागणी केली. त्यानंतर त्यांनी मोबाईल वरून जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्याशी संवाद साधला व आरोपीला कडक शिक्षा व्हावी, दोषारोप पत्र (चार्ज सीट) कोर्टात लवकर दाखल करावी, यातील दोषींला फाशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली. शिवाय समाजात अशा घटना घडू नयेत यासाठी कुटुंबियानी व ग्रामस्थांनी जागरूक असावे. जेणेकरून अत्याचाराच्या मुली म्हणजे महिला बळी ठरणार नाहीत याची काळजी घेणे काळाची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.