प्रशासकीय

राज्य परिवहन महामंडळाच्या नांदेड विभागात प्रशिक्षणार्थी शिकाऊ उमेदवारांची भरती

१२९ पदांसाठी १० मार्चपर्यंत अर्ज करता येणार

नांदेड : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नांदेड विभागात सन २०२५ -२६ या सत्रासाठी वेगवेगळया व्यवसायासाठी एक वर्ष कालावधीकरिता प्रशिक्षणार्थी शिकाऊ उमेदवारांसाठी भरती करण्यात येणार आहे. या शिकाऊ उमेदवार भरतीत नांदेड जिल्ह्यातील आयटीआय/अभियांत्रिकी पदवी, पदवीका उत्तीर्ण उमेदवारांचीच शिकाऊ उमेदवार म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. नांदेड जिल्ह्याव्यतिरीक्त इतर जिल्हयातील आयटीआय/अभियांत्रिकी पदवी, पदवीका उत्तीर्ण उमेदवारांचा अर्ज व मागील तीन वर्षापुर्वी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचा अर्ज विचारात घेतला जाणार नाही, असे राज्य परिवहन विभागाचे विभाग नियंत्रक यांनी स्पष्ट आहे.

या प्रशिक्षणासाठी आयटीआय उत्तीर्ण किंवा शिकाऊ उमेदवार भरती करण्यात येणाऱ्या विहीत केलेल्या व्यवसायाचे व्होकेशनल अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या व ऑटो इंजिनिअरींग टेक्निशिअन कोर्स उत्तीर्ण उमेदवारांनी www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाईटवर स्वत: चे रजिस्ट्रेशन करावे. अभियांत्रिकी पदवी, पदवीका उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांनी NATS पोर्टलवरील www.mhrdnats.gov.in या वेबसाईटवर स्वत:चे रजिस्ट्रेशन करावे. रजिस्ट्रेशन झाल्यावर एमआरटीसी डिव्हीजन नांदेड या आस्थापनेकरीता ऑनलाईन अप्लाय करुन रा.प. महामंडळाने विहीत नमुन्यातील छापील अर्ज भरुन सादर करणे आवश्यक राहील. हे छापील अर्ज १० मार्च २०२५ रोजी ३ वाजेपर्यंत शनिवार, रविवार व सुटटीचा दिवस वगळून विभाग नियंत्रक यांचे कार्यालय रा.प.नांदेड येथे मिळतील. अर्ज लगेच स्वीकारले जातील. या अर्जाची किंमत खुल्या प्रवगाकरीता ५९० रुपये व मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी जातीचा दाखला सादर केल्यास २९५ रुपये आहे.

या पदांसाठी दिले जाणार प्रशिक्षण...यात मेकॅनिक मोटर व्हेईकलचे ४५ पदे आहेत. तर मेकॅनिक डिझेल- ४२, शिट मेटल वर्क्स-१८, ॲटो इलेक्ट्रीशियन-६, मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडीशनर-८, पेंटर(जनरल) -४, वेल्डर (गॅस ॲन्ड इलेक्ट्रीक)-0४, अभियांत्रिकी पदवी, पदविका (मेकॅनिकल ॲटोमोबाईल मेकॅनिक /इंजिनीअर)-२ अशी एकूण १२९ पदे ऑनलाईन पध्दतीने भरण्यात येणार आहेत. यामध्ये अनुसूचीत जाती, अनुसूचीत जमाती व दिव्यांगासाठी शिकाऊ उमेदवार म्हणून कायद्यानुसार जागा आरक्षीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!