राजकीय

लोहा – कंधारचे आमदार चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी विविध कार्यक्रमांची रेलचेल

अनेक ठिकाणी होणार सत्कार, रक्तदान, आरोग्य तपासणी, महाभिषेक, अभीष्टचिंतन आणि कविसंमेलनाचेही आयोजन

नांदेड – नांदेड लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार तथा लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या दि. २ ऑगस्ट रोजी नांदेड शहर व जिल्हाभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

शनिवारी सकाळी ७ वाजता माजी आमदार मोहनअण्णा हंबर्डे यांच्या पुढाकारातून काळेश्वर मंदिर येथे आरती व दर्शन. त्यानंतर ढवळे कॉर्नर, गुंडेगाव पाटील, ढाकणी, किवळा, लोंढेसांगवी, टेळकी फाटा, मोकलेवाडी, उस्माननगर, कलंबर, भोपाळवाडी, संगुचीवाडी, पांगरा, महादेव मंदिर मानसपुरी येथे भेटी व दर्शन, मानसपुरी चौक येथे शर्करातुला तर याचवेळी मानसपुरी ग्रामपंचायतीच्या वतीने भव्य सत्कारही करण्यात येणार आहे. कोटबाजार येथे सत्कार झाल्यानंतर कंधार येथील मंदिरात आ. चिखलीकर दर्शनासाठी जातील. सकाळी १०.१५ वाजता मारोती मंदिर चौक बाचोटी, त्यानंतर कंधार शहरातील गांधी चौक, राम मंदिर, साधू महाराज संस्थान, बौद्धविहार येथे सत्कार व अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान, ह.भ.प. संदीप महाराज आलेगावकर यांचा कीर्तन सोहळाही आयोजित करण्यात आला आहे. सकाळी १०.४५ वाजता आ. चिखलीकर कंधार शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करणार आहेत. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून ग्रामीण रुग्णालयात औषधी वाटपाच्या कार्यक्रमाला आमदार उपस्थित राहणार आहेत. कंधार येथील न्यायालयासमोर स्वागत स्वीकारून ते महाराणा प्रताप, अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करतील. त्यानंतर त्यांची शर्करातुला करण्यात येणार आहे. घोडज, लहुजी साळवे चौक, दिगंबर पाटील मंगल कार्यालय सिद्धार्थनगर, भवानीनगर, साईनगर, कंधार, विजयनगर कमान, निमगड येथे स्वागत स्वीकारल्यानंतर आ. चिखलीकर दुपारी १ वाजता लोहा तालुक्यातील किरोडा फाटा येथे उपस्थित राहतील. त्यानंतर धावरी फाटा, बेरळी फाटा, जिजामाता मंगल कार्यालय येथील कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत. याच दरम्यान अहिल्यादेवी होळकर स्मारक, महात्मा संत बसवेश्वर पुतळ्यासही ते अभिवादन करणार आहेत. वाहनचालक संघटनेच्या वतीने जुना कोर्ट, लोहा येथे स्वागत समारंभ पार पडणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती लोहा, नगरपालिका लोहा, लोहा पोलीस स्टेशन, सराफा मार्केट, माजी नगराध्यक्ष कल्याणकर यांचे निवासस्थान येथेही सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या दि. २ ऑगस्ट रोजी नांदेड व लोहा-कंधार तालुक्यात तब्बल १०० ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ४.१५ वाजता शिवसेना संपर्क कार्यालयात स्वागत समारोह, त्यानंतर जय भवानी बेकरी, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथेही स्वागत होईल. त्यानंतर आ. चिखलीकर लोहा चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करतील. यावेळी पुतळा परिसरात विविध आठ ठिकाणी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी ५.४५ वाजता पारडी येथे स्वागत त्यानंतर कारेगाव, आंबेसांगवी आणि सोनखेड येथे अभीष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी ६.३० वाजता माधव पावडे आयोजित कविसंमेलन आणि अभीष्टचिंतनाचा मुख्य सोहळा पार पडणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!