
नांदेड – प्रतिवर्षाप्रमाणे अक्षय तृतीयेच्या दिवशी १९ एप्रिल रोजी क्रांतीसूर्य जगत्ज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने मोठ्या जल्लोषात साजरी होणार आहे. नांदेड शहरात रविवारी निघणाऱ्या भव्य मिरवणुकीत नांदेड जिल्ह्यातील व शहरातील हजारो कार्यकर्ते व महात्मा बसवेश्वर प्रेमी सहभागी होणार आहेत, अशी माहिती स्वागताध्यक्ष, भाजपाचे महानगराध्यक्ष तथा माजी आ.अमरनाथ राजुरकर यांनी दिली.
महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्ताने सकाळी ८ वाजता शिवलिंगेश्वर मंदिर सिडको येथे ध्वजारोहण, सिडको-हडको भागात मुख्य रस्त्यांवरून सर्व महापुरूषांच्या पुतळ्यास अभिवादन होईल. सकाळी १० वाजता विशालनगर पाटीजवळ अभिवादन होईल. दुपारी १ ते ४ दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ मोफत भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ४ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून जुना मोंढा टॉवर, नवीन कौठा ते महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्यापर्यंत भव्य दिव्य मिरवणूक निघणार आहे. जिल्हाभरातून वीरशैव लिंगायत व बसवप्रेमी नागरिक या मिरवणुकीत जल्लोषाने सहभागी होणार आहेत.
सायंकाळी ७ वाजता जयंती महोत्सवाचा समारोपीय कार्यक्रम पार पडणार आहे. समारोप कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण हे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे असतील. महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव समितीचे स्वागताध्यक्ष माजी आ. अमरनाथ राजूरकर, अध्यक्ष सोपानराव मारकवाड, कार्याध्यक्ष अनिल पाटील निमटेककर हे राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून खा. अजित गोपछडे, खा.प्रा. रवींद्र चव्हाण, माजी मंत्री डी पी सावंत, आ. भीमराव केराम, आ. तुषार राठोड, आमदार राजेश पवार, आ. बालाजीराव कल्याणकर, आ. जितेश अंतापूरकर, आमदार श्रीजया चव्हाण, आमदार आनंदराव बोंढारकर, आ. बाबुराव कोहळीकर, महापौर कविताताई मुळे, उपमहापौर दिपकसिंह रावत, सभापती विरेंद्रसिंघ गाडीवाले, राष्ट्रीय उपाध्यक्ष अभयराव कल्लावार, नगराध्यक्ष भगवानराव दंडवे, सभागृह नेता महेश कनकदंडे, महिला व बालकल्याण सभापती सदिच्छा सोनी, उपसभापती निरंजना लांडगे, राष्ट्रीय सरचिटणीस उमाकांत शेट्टे, माजी सभापती संजय बेळगे, नगरसेवक किशोर स्वामी, माजी सभापती व्यंकटराव पा. चांडोळकर, भाजपा जिल्हा प्रवक्ता संतोष पांडागळे, शिवसेना जिल्हाप्रमुख बबनराव बारसे, गंगाधर बडुरे, माजी नगराध्यक्ष मुदखेड सुनील शेट्टे, राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवा संघटना दत्ताभाऊ खंकरे, राज्य सरचिटणीस धन्यकुमार शिवणकर, राज्य उपाध्यक्ष वैजनाथ तोनसुरे, राज्य प्रवक्ता विठ्ठलराव ताकबिडे, राज्य सरचिटणीस संजय कोठाळे, राज्य उपाध्यक्ष कर्मचारी महासंघ संतोष शेटकर, जिल्हा संपर्कप्रमुख अनिल माळगे, मराठवाडा प्रमुख विरभद्र बसापुरे, मराठवाडा उपाध्यक्ष दिगंबर मांजरमकर, मराठवाडा संघटक डॉ. वैजनाथ हंगरगे, नगरसेवक वैजनाथ देशमुख आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सायंकाळी ४ वाजता होणार्या मिरवणुकीचे उद्घाटन नांदेड नांदेड परिक्षेत्राचे पोलीस महासंचालक शहाजी उमाप, जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, जिल्हा संपर्कप्रमुख अनिल माळगे व इतर मान्यवरांच्या हस्ते होईल. या भव्य मिरवणुकीत व समारोपीय कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष विलास कापसे, संभाजी पा. बुड्डे, रवींद्र पांडागळे, संभाजी पावडे, शुभम घोडके, नंदाताई पाटील, सत्यभामा एजगे, महानगराध्यक्ष गजानन कानडे, शहर प्रमुख शिवराज उमाटे, जिल्हाध्यक्ष सिद्धेश्वर स्वामी, नंदुअप्पा देवणे, शहराध्यक्ष सतीश मठपती, उपाध्यक्षा सविता निमडगे, सरचिटणीस शिवकुमार देशमुख, व्यंकटेश भोगाजे, शहरप्रमुख नंदाताई कहाळेकर, ज्योती स्वामी, पूजा संगेकर, ज्ञानोबा घोडके, प्रा. रामकिशन पालीमकर, निळकंठ चोंडे, दत्तप्रसाद पांडागळे, भीमराव वंटे, नागोराव पाटणे, गणेशराव स्वामी, गंगाराम नरडेले, आनंदराव खंदारे, शिवाजी कहाळेकर, वसंत जारीकोटे, संग्राम काडवदे व सर्व पदाधिकारी शिवा संघटना व महात्मा बसवेश्वर जयंती समिती नांदेड यांनी केले आहे.
महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरासाठी दंतरोगतज्ज्ञ डॉ. विवेक टापरे, त्वचारोगतज्ज्ञ डॉ. वर्षा टापरे, पोटविकार तज्ज्ञ डॉ. अभिजीत स्वामी, डॉ. राजेंद्र कागणे, नेत्रचिकित्सा डॉ. विभुते, मधुमेह चिकित्सक डॉ. शिवकुमार धडवई, होमीओपॅथी डॉ. गजानन देलमाडे, जनरल फिजिशियन डॉ. मन्मथ हे तज्ज्ञ डॉक्टर आरोग्य सेवा देणार आहेत.



