क्राईम

लोह्यात पतीने पत्नीवर झाडल्या गोळ्या..!

गोळीबारात पत्नी गंभीर जखमी, घटनेनंतर पती झाला फरार, कौटुंबिक वादातून घटना घडल्याचा संशय

नांदेड –  लोहा शहरातील उच्चभ्रूची वसाहत समजल्या जाणाऱ्या शिक्षक कॉलनी भागात एका कुटुंबात पती पत्नीत क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान गोळीबारात झाले. पतीने पत्नीवर झाडलेल्या गोळीबारात पत्नी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदरील घटना दि. ६ रोजी रात्री घडली. घटनास्थळास जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. जिल्ह्यात शहरी भागात गोळीबाराच्या घटना  सातत्याच्या असल्या तरी आता त्याचे लोण ग्रामीण भागात पोहचत असल्याचे सदर घटनेवरून समोर आले आहे

लोहा शहरातील संत गाडगे महाराज विद्यालय व महाविद्यालय पाठीमागे असलेल्या उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या शिक्षक कॉलनी भागात जाधव कुटुंबीय मागील अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहे. तिथे त्यांचे विद्यार्थी वसतिगृह आहे. त्याच्या बाजूस असलेल्या बिल्डिंगमध्ये हे कुटुंब वास्तव्यास आहे. प्रत्येक मुलांना वेगवेगळ्या खोल्या आहेत. कुटुंबीय जेवण आटोपून आपापल्या खोलीत झोपले असताना दैनंदिन प्रमाणे विशाल सुरेश जाधव हा ६ जुलैच्या रोजी रात्री अकरा ते साडेअकरा वाजताच्या सुमारास घरी आला. पत्नी अर्चनाने त्यास जेवणाचे ताट वाढून दिले. तेव्हा त्यांच्यात कुठल्यातरी कारणावरून बाचाबाची झाली असल्याचे परिसरातील रहिवाशातून सांगण्यात आले. काही वेळाने पती विशाल जाधवने त्याच्या जवळ असलेल्या पिस्तुलातून पत्नी अर्चनावर गोळ्या झाडल्या. तेव्हा पत्नीने बहुतेक गोळी चुकविण्याचा प्रयत्न केला असावा असे बाजूच्या दरवाजावर लागलेल्या गोळ्याच्या खुणेवरून दिसून आले. सदरील घटना रात्री अकरा ते साडेअकरा वाजताच्या सुमारास घडली असल्याचे सांगितले जात आहे. गोळीचा आवाज ऐकून बाजूच्या खोलीत असलेले विशालचे वडील सुरेश जाधव व इतर कुटुंबीय धावत आले. तेव्हा विशाल जाधव हा घटनास्थळावरून पळून गेला. जाधव कुटुंबियांनी गंभीर जखमी अर्चना हिस तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलविले. सध्या त्यांच्यावर नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एकूण तीन गोळ्या झाडल्या असल्याचे समजते. लोहा पोलिसात पत्नी अर्चना विशाल जाधव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळास नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन, अप्पर पोलिस अधीक्षक सूरज गुरव सह वरिष्ठ पोलिस अधिकारी, स्थानिक पोलिस अधिकारी, कर्मचारी यांनी भेट देऊन पंचनामा केला. ठसे तज्ञ, श्वान पथक, फॉरेन्सिक टीम यांनी घटनास्थळाचा बारकाईने शोध घेत असल्याचे सांगितले. लोहा पोलिसात पत्नी अर्चना विशाल जाधव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्ह्यात शहरी भागात गोळीबाराच्या घटना  सातत्याच्या असल्या तरी आता त्याचे लोण ग्रामीण भागात पोहचत असल्याचे सदर घटनेवरून समोर आले आहे.

विशाल हा नांदेड येथे खाजगी वाहन चालक असल्याचे समजते. तो गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून त्याच्यावर अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. तर त्याची पत्नी ही त्याच्या मामाचीच मुलगी असल्याचे कळते. संशयी वृत्तीतून हा हल्ला झाला असावा अशी कुजबुज परिसरात सुरू असून पोलिस घटनेचा कसून तपास करत आहेत. आरोपी विशाल जाधव याच्याकडे पिस्तूल आली कुठून..? असा सवाल उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन हे घटनेच्या दिवशीच लोहा पोलिस ठाण्यात येऊन त्यांनी लोहा पोलिस ठाण्याचा आढावा घेतला होता. त्यांनी लोहा सोडून काही तासांचा अवधी उलटताच लोहा शहरात गोळीबाराची घटना घडली. सदरील घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. तर लोहा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जाधव हे सुट्टीवर होते. घटनास्थळास नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन, अप्पर पोलिस अधीक्षक सूरज गुरव सह वरिष्ठ पोलिस अधिकारी, स्थानिक पोलिस अधिकारी, कर्मचारी यांनी भेट देऊन पंचनामा केला. ठसे तज्ञ, श्वान पथक, फॉरेन्सिक टीम यांनी घटनास्थळाचा बारकाईने शोध घेत असल्याचे सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!