Police

नांदेडमध्ये आता चोऱ्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षकांची विशेष पथके..!

प्रत्येक पथकामध्ये १ पोलीस अधिकारी आणि ३ पोलीस अंमलदारांचा समावेश, बसस्थानक, रेल्वे स्टेशन, बँकासह चोरी प्रवण ठिकाणांवर राहणार विशेष लक्ष

नांदेड – नांदेड जिल्ह्यातील घरफोडी चोरी तसेच इतर मालमत्ता विषय गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी नांदेड शहर इतवारा आणि नांदेड ग्रामीण या उपविभागांमध्ये विशेष पेट्रोलिंग पथके कार्यान्वित करण्यात आले आहेत या विशेष पथकांची नजर आता बस स्थानक, रेल्वे स्टेशन, एटीएम, बँक, पेट्रोल पंप, व्यापारी संकुल, निर्जन भाग तसेच चोरीस प्रवण ठिकाणावर राहणार आहे.

पोलीस अधीक्षकांच्या या विशेष पथकामध्ये एक पोलीस अधिकारी आणि तीन पोलीस अंमलदार यांचा समावेश करण्यात आला आहे. ही पथक नियमित गस्त घालणार आहेत. विशेषत: बस स्थानक, रेल्वे स्टेशन, एटीएम, बँक, पेट्रोल पंप, व्यापारी संकुल, निर्जन भाग आणि चोरीस प्रवण ठिकाणावर ही पथके विशेष लक्ष केंद्रित करणार आहेत. या पथकांवर पोलीस नियंत्रण कक्षामार्फत सातत्याने देखरेख ठेवण्यात येणार आहे. वरिष्ठ अधिकारी नियमित तपासणी करणार आहेत. या उपक्रमामुळे मालमत्तेविषयक गुन्ह्यावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यास मदत होईल तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ होईल, असा विश्वास जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी व्यक्त केला आहे. पहिल्या टप्प्यात ही विशेष पथके किती राहतील हा आकडा अद्यापही पुढे आला नाही. लवकरच पथकांचा आकडा समोर येईल.

स्थानिक पोलिसांच्या कामगिरीवर राहणार नजर..! नूतन पोलीस अधीक्षक डॉक्टर निलाव रोहन रुजू होताच आता विशेष पोलीस पथकांची निर्मिती करण्यात आली आहे या पथकांच्या निर्मितीच्या माध्यमातून स्थानिक पोलिसांच्या कामगिरीवरच एक प्रकारे नजर ठेवली जाणार आहे. त्याचवेळी स्थानिक पोलिसांना या पथकांची निश्चितच मदत होणार आहे; पण त्याचवेळी एका प्रकारे या पथकांची नजरही स्थानिक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवार राहील. ही पथके थेट पोलीस अधीक्षकांकडे रिपोर्टिंग करणार आहेत. त्यामुळे प्रत्येक ठाण्यांतर्गत सुरू असलेल्या घडामोडींवर थेट पोलीस अधीक्षकांची नजर राहणार आहे. दुसरीकडे या विशेष पथकांवरही कंट्रोल रूमच्या माध्यामातून नियंत्रण राहिल हेही महत्त्वाचे..!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!