राजकीय

वंचित बहुजन आघाडीचे फारुख अहमद शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार

वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजलीताई आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार

नांदेड –  वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार फारुख अहमद हे नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजलीताई आंबेडकर व प्रमुख पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत शुक्रवार दि.२५ ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून भव्य रॅली काढत ते आपली उमेदवारी दाखल करणार आहेत.

नांदेड जिल्हा हा आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जातो. दलित, मुस्लिम व ओबीसी समाजाचे निर्णायक मतदान या जिल्ह्यात आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी नांदेड (दक्षिण) मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष फारुख अहमद यांना दुसर्‍यांदा उमेदवारी दिली आहे. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला. वंचित बहुजन आघाडीच्यावतीने शुक्रवारी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर भव्य रॅलीद्वारे महामानवांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर नांदेड तहसील कार्यालयात फारुख अहमद हे नांदेड दक्षिण मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजलीताई आंबेडकर व पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.

आमची भूमिका वंचितांची भूमिका- फारुख अहमद…नांदेड जिल्ह्याच्या राजकारणाचा इतिहास पाहिला तर रिपब्लिकन चळवळ आणि मुस्लिमांचे एक मोठे अधिकार क्षेत्र राजकारणात राहिले आहे. नांदेड जिल्ह्यात प्रारंभी दलित, मुस्लिम नेते निवडून आले आहेत किंवा दुसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत. पुढे मात्र नांदेड जिल्ह्यातील नेत्यांनी मुस्लिम आणि दलितांना केवळ वोट बँकेत रुपांतरीत केले आहे. मात्र ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी सर्व समाजघटकांना सोबत घेऊन राजकीय अस्पृश्यतेच्या विरोधात राज्यात एक सर्वसमावेशक काम केले आहे. ॲड. बाळासाहेब हे सर्व समावेशक नेतृत्व असल्याने त्यांची ही भूमिका सर्वश्रुत आहे. वंचितबाबत अनेक गैरसमज पसरविले जात आहेत. मात्र भ्रष्टाचाराचे आरोप करून एखाद्याला टारगेट केले जाते. मात्र एका पैशाचाही भ्रष्टाचार न करता वंचितचे नेते आज राजकारणात आपली भूमिका मांडत आहेत. आपले स्थान निर्माण करत आहेत. त्यांच्या उणिवा सापडत नाहीत. त्यामुळे त्यांना वेगवेगळे आरोप करून टारगेट केले जात आहे. आता यावर ठोस भूमिका घेऊन उत्तर देण्याची जबाबदारी ही केवळ वंचितच्या कार्यकर्ते, नेते यांच्यावर नाही तर समाजातील विविध सामाजिक घटकावर आहे. चळवळीवर विश्वास ठेवणाऱ्यांवर आहे. ॲड. बाळासाहेबांनी घेतलेल्या या सर्व समावेशक भूमिकेतून आम्हाला नांदेडमध्ये विजयाचा विश्वास असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे नांदेड दक्षिणचे उमेदवार फारूख अहमद यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!