शैक्षणिक

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने विविध ५५ विषयांचे लावले पंधरा दिवसात निकाल 

उर्वरित विषयांचेही ३१ मे पर्यंत निकाल घोषित होतील- कुलगुरू डॉ. मनोहर चासकर 

नांदेड – नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने केवळ पंधरा दिवसात ५५ हून अधिक विषयांचे निकाल घोषित केले आहेत. महाराष्ट्रात इतक्या कमी वेळात निकाल घोषित करणारे नांदेडचे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ हे एक असल्याचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी सांगितले.

विद्यापीठांच्या परीक्षांचे निकाल लांबल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना अडचणी निर्माण होत असतात. ही बाब लक्षात घेऊन नूतन कुलगुरू डॉ. मनोहर
चासकर यांनी निर्धारित वेळेत निकाल लावण्याच्या सूचना दिल्या होत्या. यासाठी विशेष मोहिमही राबविण्यात आली. त्यानुसार परीक्षा झाल्यापासून अवघ्या दहा ते बारा दिवसात निकाल देण्याचा प्रयत्न करण्याचे निर्देश देण्यात आले होते.  त्यामुळे विद्यापीठाने एकूण ५५ विषयांचे निकाल पंधरा दिवसांच्या आत जाहीर केले आहेत. या विषयामध्ये एम.एस. डब्ल्यू. प्रथम वर्ष, एम. ए. प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष, बीए, बीएसस्सी,  एम. कॉम.,  एम. एसस्सी, डिप्लोमा कोर्स इन फ्रेंच, सर्टिफिकेट कोर्स इन फ्रेंच आदी विषयांचा समावेश आहे. उर्वरित विषयांचे निकाल ही ३१ मे पर्यंत जाहीर होतील असा विश्वास कुलगुरू डॉ. चासकर यांनी व्यक्त केला.
 विद्यापीठाने फार्मसी या अभ्यासक्रमाच्या उत्तरपत्रिका  यावर्षीपासून ऑन स्क्रीन तपासणीसाठी मोहीम हाती घेतली होती. त्याला यश आल्याचेही त्यांनी सांगितले. विद्यापीठाच्या वतीने आगामी वर्षापासून सर्व उत्तर पत्रिका या ऑन स्क्रीन तपासल्या जातील, यासाठी प्रयत्न केले जातील असेही कुलगुरू यांनी सांगितले.
दरम्यान स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियांना १ जून पासून सुरुवात होणार आहे. यावर्षी पारंपारिक अभ्यासक्रमासोबतच रोजगाराभिमुख असे अनेक नवे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. चासकर यांनी दिली. नवीन शैक्षणिक धोरणानुसार पदव्युत्तर स्तरावर एम. एसस्सी डेटा सायन्स, जिओ इन्फॉर्मेटिक्स, औद्योगिक मानसशास्त्र, पदवीस्तरावर बीएसस्सी डेटा सायन्स, बीसीए आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, बीबीए, बीएमएलटी, न्यूट्रिशियन अँड डायट्स, डिप्लोमा इन डिजिटल मार्केटिंग, डिप्लोमा इन बँकिंग, डिप्लोमा इन मोबाईल रिपेरिंग, ब्युटी अँड कॉस्मेटिक्स, सायबर सेक्युरिटी अशा प्रकारचे रोजगार उपलब्ध होणारे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत.
कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमासोबतच व्हॅल्यू ॲडेड अभ्यासक्रमही यावर्षीपासून सुरू करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे हे अभ्यासक्रम वेगवेगळ्या उद्योग कंपन्यांशी सामंजस्य करार करून राबविले जाणार आहेत.
https://youtu.be/Wp7KgIGvrck?si=T4XKsPlgTEiuFf3y
फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे यांच्यासोबत चित्रपट व मीडिया संबंधित विशेष अभ्यासक्रमाही राबविले जाणार आहेत. फाउंडेशन कोर्स इन स्क्रीन ॲक्टिंग, स्मार्टफोन फिल्म मेकिंग, एक वर्ष कालावधीचा स्क्रीन प्ले रायटिंग व सर्टिफिकेट इन ऑडिओ व्हिज्युअल प्रोडक्शन असे अभ्यासक्रम राबविल्या जाणार आहेत. एफ. टी. आय. आय. येथील प्राध्यापक  या अभ्यासक्रमादरम्यान प्रत्यक्ष मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे माध्यम आणि सिनेमाच्या क्षेत्रात हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना रोजगाराच्या चांगल्या संधी मिळतील असा विश्वासही कुलगुरू डॉ. चासकर यांनी व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!