शैक्षणिक

दहावीच्या परीक्षेत नांदेड जिल्ह्याचा ९१ टक्के निकाल 

मुलींनीच मारली बाजी, लातूर विभागात नांदेड जिल्हा तिसऱ्या स्थानी, जिल्ह्यात ९४.२१ टक्के मुलींना मिळाले यश; तर ८८.१५  मुलांच्या यशाची टक्केवारी

नांदेड – शालांत परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी ऑनलाईन पद्धतीने घोषित झाला असून यात नांदेड जिल्ह्याचा ९१ टक्के निकाल लागला आहे. या निकालात मुलींना ९४.२१ टक्के तर मुलांना ८८.१५ टक्के यश या निकालात मिळाले आहे. त्यामुळे दहावीच्या निकालातही मुलींनीच बाजी मारल्याचे स्पष्ट झाले आहे. दहावीच्या निकालात लातूर विभागात नांदेड जिल्ह्याचा तिसरा क्रमांक राहिला आहे.

इयत्ता दहावीच्या परीक्षेत नांदेड जिल्ह्यातील ४८ हजार १९१ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती त्यामध्ये २५ हजार ५०८ मुलांचा तर २२ हजार ६८३ मुलींचा समावेश होता. नोंदणी केलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ४७ हजार ५६८ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. परीक्षा देणाऱ्यामध्ये २२ हजार ४२० मुली होत्या तर २५ हजार १४८ मुलांची संख्या होती.

या निकालामध्ये इयत्ता दहावीचे ४३ हजार २९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण होण्याचे हे प्रमाण ९१ टक्के इतके आहे. दहावी निकालात नांदेड जिल्हा लातूर विभागात तिसऱ्या स्थानी राहिला आहे. कॉपीमुक्ती मोहीमेनंतरही नांदेड जिल्ह्याचा निकाल ९१ टक्के लागला आहे हे विशेष.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!