
नांदेड – इयत्ता बारावीच्या परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी हिंदी विषयाच्या परीक्षेत १५ हजार २६६ विद्यार्थी उपस्थित राहिले तर ३३८ विद्यार्थी अनुपस्थित होते. परीक्षेदरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी नायगाव तालुक्यातील दोन संवेदनशील केंद्रांना भेट देऊन पाहणी केली. यादरम्यान केंद्रावरील दोन कर्मचाऱ्यांना त्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
जिल्ह्यात बारावीच्या परीक्षा ११ फेब्रुवारीपासून सुरू झाल्या आहेत. या परीक्षा पारदर्शकपणे आणि कॉपीमुक्त व्हाव्यात यासाठी संपूर्ण जिल्हा प्रशासन मैदानात उतरले आहे. परीक्षेच्या पहिल्या दिवशी खुद्द जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्यासह राज्य परीक्षा संचालकही नांदेड जिल्ह्यातील अनेक केंद्रावर पोहोचले होते. केंद्रावरील असुविधा तसेच काही कर्मचाऱ्यांच्या एकूणच भूमिकेबाबत आलेली शंका पाहता त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तसेच कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी नायगाव तालुक्यातील दोन संवेदनशील केंद्रांना भेटी दिल्या. या भेटीत त्यांनी केंद्रावरील सर्व परीक्षा हॉलची तपासणी केली. कर्तव्यात कुचराई करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे. जिल्ह्यात उच्च माध्यमिक आणि लवकरच सुरू होणाऱ्या उच्च माध्यमिक परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात यासाठीच सर्व यंत्रणांना कडक निर्देश दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परीक्षा प्रक्रियेत कोणतीही गैरप्रकार घडू नयेत यासाठी प्रशासन सतर्क आहे.
बैठे पथकाला बजावली नोटीस… सहायक जिल्हाधिकारी तथा कंधार तालुका दंडाधिकारी अनुष्का शर्मा यांनी कंधार तालुक्यातील शेकापूर येथे महात्मा फुले विद्यालयास विद्यालयातील परीक्षा केंद्रावर भेट दिली. त्यावेळी काही विद्यार्थी हे कॉपी करत असल्याचे दिसून आले. भेटीदरम्यान बैठे पथक आपले कर्तव्य बजावत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे परीक्षेच्या कामात कसूर का केली याचा खुलासा करण्याचे निर्देश अनुष्का शर्मा यांनी बैठ्या पथकातील दोन कर्मचाऱ्यांना दिले आहेत. त्याचवेळी शेकापूरच्या केंद्रप्रमुखालाही नोटीस बजावली आहे.
Go to capitain He said dumping on top So as we have an