
नांदेड – युपीएससी, एमपीएससी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गात प्रवेश घेण्यासाठी नांदेडमधील आंबेडकरवादी मिशन या देश पातळीवरील नामांकित संस्थेची प्रवेश पूर्व परीक्षा २६ जून रोजी सकाळी ११ वाजता मिशन केंद्राच्या सिडको येथील केंद्रात घेण्यात येणार आहे. सर्व जाती धर्मातील विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्या नंतर सहा महिन्यासाठी मार्गदर्शन वर्गात आत्यंतिक नाममात्र देणगी शुल्क आकारून प्रवेश दिला जाईल.
आंबेडकरवादी मिशनचे १८४ पेक्षा अधिक विद्यार्थी आयएएस, आयपीएस, आयएफएस, आयआरएस पदी देशभर कार्यरत आहेत. एमपीएससी तर्फे २०० पेक्षा जास्त वर्ग १, वर्ग २ अधिकारी, २५० पोलीस निरीक्षक, ६० बँक पीओ आणि किमान एक हजार विद्यार्थी सरकारी नोकरीत कार्यरत आहेत. सर्व प्रवर्गातील गरीब विद्यार्थ्यांचे अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आंबेडकरवादी मिशन गेल्या वीस वर्षापासून कार्यरत आहे. आयएएस होण्याचे गरीब विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नवी दिल्ली येथील नेक्स्ट आयएएस या खाजगी क्लासची मार्गदर्शन सुविधा नांदेड येथे आंबेडकरवादी मिशनमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. एमपीएससी तयारीसाठी दररोज पाच तास मार्गदर्शन वर्ग, वसतीगृह, मुलीसाठी सुरक्षित स्वंतत्र निवासी व्यवस्था, २४ तास अभ्यासिका, ग्रंथालय, मेस सुविधा, छापील नोट्स, टेस्ट सीरीज आदी सुविधा आंबेडकरवादी मिशनमध्ये उपलब्ध आहेत.
२६ जून रोजी राजर्षी शाहू महाराज जयंती दिनी आयोजित प्रवेश पूर्व परीक्षा मिशनच्या सिडको येथील केंद्रावर आयोजित केली जाईल, राज्यपातळीवर विद्यार्थ्यानी यात सहभागी होऊन मिशन केंद्राच्या मार्गदर्शन वर्ग आणि सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दीपक कदम यांनी केले आहे. नाव नोंदविण्यासाठी व प्रवेशासाठी आंबेडकरवादी मिशनच्या 9326932049 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.