प्रशासकीय

लोह्यात मतदान प्रशिक्षणास गैरहजर राहणाऱ्या १०५ कर्मचाऱ्यांना नोटीस

पुन्हा एकदा होणाऱ्या प्रशिक्षणास गैरहजर राहिल्यास कारवाईचा ईशारा

लोहा – लातूर लोकसभा मतदार संघात लोहा विधानाभा मतदार संघाचे समावेश होतो. ४ एप्रिल रोजी लोहा, कंधार तालुक्यातील १ हजार ६७६ कर्मचाऱ्यांचे मतदान प्रशिक्षण विक्की गार्डन पारडी लोहा येथे पार पडले. यावेळी १०५ कर्मचारी प्रशिक्षणास हजर नव्हते. या सर्व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून ७ एप्रिल रोजी त्याचे पुन्हा प्रशिक्षण होणार आहे. त्यावेळी गैरहजर राहिल्यास त्या कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल असे लातूर लोकसभा मतदार संघाच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अरूणा संगेवार यांनी स्पष्ट केली.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने १ हजार ६७६ कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण विक्की गार्डन लोहा पारडी येथे ४ तारखेला पार पडले. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अरुणा संगेवार यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. तहसीलदार विठ्ठल परळीकर, कंधार तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी प्रशिक्षण दिले. नायब तहसिलदार संजय भोसीकर, रेखा चमनार, अशोक मोकले परळकर, पाठक हे नायब तहसीलदार उपस्थित होते. या प्रशिक्षणाडे १०५ कर्मचारी गैरहजर राहिले. त्यांना दुसऱ्याच दिवशी उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

 लातूर लोकसभा मतदार संघातील निवडणुक कर्तव्यावर मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी म्हणून कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रथम प्रशिक्षण ४ तारखेला  पार पडले. उपस्थित राहण्यासाठी आदेशित करूनही प्रशिक्षणास गैरहजर राहिले व निवडणूकीच्या कामकाजात कसूर केली. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ चे कलम १३४ अन्वये कार्यवाही का करण्यात येवू नये? याबाबतचा लेखी खुलासा नोटीस मिळाल्यापासुन २४ तासाच्या उपविभागीय अधिकारी यांच्या समक्ष सादर करावा, अशी नोटीस १०५ कर्मचाऱ्यांना बजावण्यात आली आहे. त्यांचे पहिले प्रशिक्षण पुन्हा एकदा ७ तारखेला रोजी दुपारी १२ वाजता विक्की गार्डन, लोहा येथे ठेवण्यात आले आहे. या प्रशिक्षणास अनुपस्थित रहिल्यास तसेच विहित मुदतीत खुलासा सादर न केल्यास आपले काहीही म्हणने नाही असे गृहीत धरून लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ चे कलम १३४ अन्वये कारवाई प्रस्तावीत करण्यात येईल असे सहायक निवडणूक अधिकारी अरुणा संगेवार यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!