
नांदेड – राज्यसभा सदस्य म्हणून माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी आज शनिवारी नवी दिल्ली येथे शनिवारी शपथ घेतली. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी त्यांना सदस्यत्वाची शपथ दिली. यावेळी उपसभापती हरिवंश, महासचिव पी.सी. मोदी उपस्थित होते.
शपथ घेतल्यानंतर चव्हाण यांनी विधानपरिषद, विधानसभा, लोकसभा आणि राज्यसभा या चारही सभागृहात काम करण्याची संधी मिळाल्याचे सांगितले. राज्यसभेवर संधी दिल्याबद्दल पक्षनेतृत्वासह संपूर्ण भारतीय जनता पक्षाचे आभार मानले. आगामी काळात पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारताच्या उभारणीसाठी सर्वोपरी योगदान देण्याचा प्रयत्न करेन अशी ग्वाहीही त्यांनी दिली. या शपथ ग्रहण सोहळ्यास चव्हाण यांचे कुटुंबीय उपस्थित होते. त्यामध्ये त्यांच्या सौभाग्यवती तथा माजी आमदार अमिता चव्हाण, श्रीजया चव्हाण यांची उपस्थिती होती.