
नांदेड- नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने १४ एप्रिल रोजी सकाळी ७.३० वाजता “बोधिसत्व प.पू.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर” यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त रेल्वेस्टेशन जवळील पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यावेळी महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी भदन्त पय्याबोधी थेरो यांनी त्रिशरण पंचशील ष्टगाथेचे सामूहिक पठन करून बाबासाहेबांना वंदन केले. तदनंतर उपस्थित नागरिकांना आयुक्त डॉ. डोईफोडे यांनी संबोधित करतांना बाबासाहेबांचे कार्य प्रेरणा देणारे असून प्रशासकीय कारभार सांभाळताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आम्हा अधिकाऱ्यांना कायम मार्गदर्शक ठरत असतात असे स्पष्ट केले.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्यासह उपायुक्त कारभारी दिवेकर, मुख्य लेखापरीक्षक तु.ल.भिसे, उपायुक्त स.अजितपालसिंघ संधू, शहर अभियंता दिलीप आरसुडे, कार्यकारी अभियंता संघरत्न सोनसळे, सुमंत पाटील, सहाय्यक आयुक्त मो.गुलाम सादिक, क्षेत्रिय अधिकारी डॉ.मिर्झा फरहतुल्ला बेग, रावण सोनसळे संभाजी कास्टेवाड, कार्यालय अधिक्षक गौतम कवडे, सुमेध बनसोडे व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.