प्रशासकीय

‘व्हाट्सअप’वर प्रचार करणारा नायगाव पं.स. चा वरिष्ठ सहाय्यक निलंबित

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांची धडाकेबाज कारवाई

नांदेड,  : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असतानाही  आपल्या एका ‘व्हाट्सअप ‘, ग्रुपवरून राजकीय प्रचार करणे जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ सहायकास  महागात पडले आहे. आचारसंहितेचा भंग  केल्याच्या कारणावरून मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी त्या कर्मचाऱ्यास तडकाफडकी निलंबित केले आहे.

नायगाव पंचायत समितीमधील वरिष्ठ सहाय्यक यु. एस. धोटे यांनी आपल्या एका व्हाट्सअपद्वारे  राजकीय पक्षाचा प्रचार केल्याची बाब निदर्शनास आली होती.  याबाबत खात्री होताच वरिष्ठ सहाय्यक धोटे यांना निलंबित करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी गुरुवारी जारी केले आहेत.

‘व्हाट्सअप ‘द्वारे निवडणुकीच्या प्रचाराबाबतचा संदेश देऊन या कर्मचाऱ्याने आदर्श आचारसंहितेच्या नियमाचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (वर्तणूक ) नियम १९६७ मधील कलम ३ व ४ कायद्यान्वये ही कारवाई करण्यात आली आहे.

जिल्ह्यात शिक्षक तसेच इतर कर्मचाऱ्याकडूनही आपल्या व्हाट्सअप ग्रुप तसेच व्हाट्सअप स्टेटस द्वारे राजकीय प्रचाराचा धुराळा उडवला जात आहे. या प्रकाराकडेही प्रशासनाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

निवडणुकीच्या काळात निलंबनाची ही पहिली कारवाई ठरली आहे. जिल्ह्यात  आदर्श आचारसंहितेचा भंग कोणाकडूनही होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. याबाबत बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!