धार्मिक

‘अजितदादां’च्या अस्थी कलशाचे सोमवारी नांदेडमध्ये आगमन 

काळेश्वर मंदिर विष्णूपुरी, नांदेड येथे मंगळवारी रात्री ९ वाजता अस्थी विसर्जन करण्यात येणार

नांदेड – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अस्थिकलशाचे सोमवारी दुपारी नांदेडमध्ये आगमन होणार आहे. दादांचा अस्थी कलश दर्शन घेण्यासाठी दुपारी ४.०० ते रात्री ८ वाजेपर्यंत वसंतनगर येथील साई-सुभाष या आ. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात ठेवण्यात येणार आहे.

मंगळवार ३ फेब्रुवारी रोजी अस्थिकलश सकाळी ८ वाजता वसंतनगर, नांदेड येथून महादेव दालमिल – आयटीआय चौक – शिवाजीनगर – वजिराबाद चौक – चिखलवाडी कॉर्नर – जुना मोंढा – साईबाबा कमान कौठा – ढवळे कॉर्नर – चंदासिंग कॉर्नर – मारतळा – कहाळा – नायगाव कृष्णूर – घुंगराळा – सकाळी ११ वाजता शंकरनगर – खतगाव पाटी – दुपारी १:३० वाजता देगलूर – दुपारी २:३० वाजता खानापूर – जाहुर मार्गे दुपारी ३:३० मुखेड येथे पोहोचणार आहे. ४:३० वा. मुखेडहून – सायं ५:३० ते ६:३० कंधार. कंधार येथे सायंकाळी ७ ते  रात्री ८ वा. लोहा येथे व रात्री ९ वाजता काळेश्वर मंदिर विष्णुपुरी, नांदेड येथे अस्थी विसर्जन करण्यात येणार आहे.

या अस्थीकलश यात्रेमध्ये आ. चिखलीकर यांच्या समवेत माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश पोकर्णा, माजी आमदार मोहनराव हंबर्डे, माजी आमदार अविनाशराव घाटे, माजी आमदार सुभाषराव साबणे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर, नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर कार्याध्यक्ष माधव पावडे, शहर कार्याध्यक्ष सरजीतसिंघ गिल व राष्ट्रवादी काँग्रेस नांदेडचे सर्व पदाधिकारी अस्थीकलश यात्रेत सहभागी होणार आहेत. दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांवर प्रेम करणाऱ्या सर्व जनतेने अस्थिकलशाचे दर्शन घ्यावे, असे आवाहन जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!