महापालिका

नांदेड महानगरपालिकेने अतिक्रमण झालेला तब्बल दीड एकरचा भूखंड घेतला ताब्यात

उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार करण्यात आली कार्यवाही, २४ जुलै २०२५ रोजी दिला होता महापालिकेच्या बाजूने निकाल

नांदेड :- शहरातील महापालिकेच्या मालकी हक्काच्या जागेवर अतिक्रमण करुन अनधिकृत वापर होत असलेला मौ.असदुल्लाबाद येथील सर्व्हे नं.०१,०२ सि.स.नं.९४९६ मधील १ एकर २० गुंठे जागेवरील अतिक्रमण काढून टाकण्याची कारवाई ६ ऑगस्ट रोजी उपायुक्त स.अजितपालासिंघ संधू यांच्या नेतृत्वात करण्यात आली. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सदरील अतिक्रमण हटवून महापालिकेने हा दीड एकरचा भूखंड आपल्या ताब्यात घेतला आहे.
महानगरपालिकेच्या मालकीच्या असलेल्या नगर भूमापन क्र.९४९६ यावर प्रियदर्शनी मेमोरीयल ट्रस्ट संचलित शाळा व्यवस्थापनाने अनधिकृतपणे अतिक्रमण करुन विनापरवानगी वापर सुरु केला होता. सदरील प्रकरण उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका क्र.५७८८/१६ अन्वये न्यायप्रविष्ठ होते. बऱ्याच वर्षाच्या न्यायालयीन लढ्यानंतर उच्च न्यायालयाने २४ जुलै २०२५ रोजी रोजी आदेश पारीत करुन नांदेड महापालिकेच्या बाजुने निकाल दिला. या प्रकरणात अतिक्रमणधारकाची याचिका फेटाळली आहे. त्याअनुषंगाने ६ ऑगस्ट रोजी प्रियदर्शनी ट्रस्ट, नांदेडचे अध्यक्ष बाळासाहेब जळबाजीराव म्हादसवाड यांचे पुत्र आकाश बालासाहेब म्हादसवाड यांचे समक्ष अतिक्रमण जमीनदोस्त करुन सदर जागेवर महापालिकेचा फलक लावून जागा ताब्यात घेण्यात आली.
ही कारवाई महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त स.अजितपालसिंघ संधू यांच्यासह मुख्य उद्यान अधीक्षक डॉ. मिर्झा फरहतुल्ला बेग, क्रीडा अधिकारी रमेश चवरे, अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त रावण सोनसळे, क्षेत्रिय अधिकारी गौतम कवडे, राजेश जाधव, अग्निशमन अधिकारी केरोजी दासरे आदींनी पार पडली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!