नांदेड : नांदेडमध्ये गेल्या पंचवीस वर्षांपासून गोदावरी नदीला आता आलेल्या पुराइतका मोठा पूर कधीच आला नव्हता. साधारणतः दरवर्षी एक लाख ते सव्वा लाख क्युसेस पूर येत असे. परंतु यंदा प्रथमच तब्बल २ लाख ९० हजार क्युसेस इतका प्रचंड महापूर आल्याने प्रशासनासमोर अभूतपूर्व आव्हान उभे राहिले होते. परंतु जिल्हा प्रशासनाच्या तत्पर कार्यवाहीमुळे व विष्णूपुरी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी वेळेत केलेल्या विविध उपाययोजनांमुळे प्रकल्पाच्या पूरपरिस्थतीवर नियंत्रण मिळविण्यास यश आले आहे. पण त्याचवेळी प्रकल्पाच्या या पाच दरवाजांची दुरुस्ती झाली नसती तर..? असा भीतीदायक प्रश्नही यानिमित्ताने नांदेडकरांच्या पुढे आला आहे. प्रकल्पाला एकूण १७ की १८ दरवाजे हा विषयही चर्चेत आला आहे.
नांदेड शहराची तहान भागवण्यासाठी, तीन तालुक्यांतील दुष्काळावर मात करण्यासाठी आणि नांदेड एमआयडीसीच्या विकासासाठी दिवंगत, माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून विष्णूपुरी प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. या विष्णूपुरी प्रकल्पाचे पूर्वी पूरनियंत्रणासाठी केवळ सव्वा लाख ते दीड लाख हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यासाठी काही दरवाजे उघडले जात असत. २००६ मध्ये सर्वाधिक १२ दरवाजे उघडण्यात आले होते. परंतु यंदा आलेल्या महापुरामुळे प्रथमच विष्णूपुरी प्रकल्पाचे १७ चे १७ दरवाजे पूर्णपणे उघडावे लागले. प्रकल्पाचा १८ क्रमांकाचा दरवाजा वर्षानुवर्षे बंदच आहे. हे मोठे संकट समोर असताना प्रशासनाने वेळीच निर्णय घेतला आणि पुराचे पाणी सुरक्षितपणे सोडण्यात यश मिळवले.
प्रत्यक्षात नांदेडमध्ये विष्णूपुरी प्रकल्पातील पाच दरवाजे ऐन महापुराच्या काळात मोठ्या नादुरुस्त होते. त्यामुळे एवढ्या महापुराच्या वेळी ते कार्यान्वित करणे हे पाटबंधारे विभागासमोर मोठे संकट होते. अशा परिस्थितीत कार्यकारी अभियंता दत्तात्रय रा. सावंत, चारुदत्त बनसोडे, अशोक चव्हाण, नवनाथ पिसोटे (उपअभियंता) तसेच सहाय्यक अभियंता शिवम ससाने यांनी युद्धपातळीवर काम सुरू केले. रात्रंदिवस प्रयत्न करून, अवघ्या काही तासांत नादुरुस्त दरवाज्यांची दुरुस्ती करण्यात आली. परिणामी १७ पैकी एकही दरवाजा अडथळ्याविना कार्यान्वित करण्यात आला. नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ तसेच प्रशासनाने कार्यकारी अभियंता आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे विशेष कौतुक केले. विष्णूपुरी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी दाखवलेली तत्परता आणि जबाबदारी कौतुकास्पद ठरली आहे.
दुसरीकडे विष्णूपुरी प्रकल्पाचे एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल पाच दरवाजे ऐन महापुराच्या काळात नादुरुस्त राहतात कसे..? ही गंभीर बाबही यानिमित्ताने पुढे आली आहे. यंदा ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात म्हणावा तसा पाऊस झाला नव्हता. ऑगस्टमध्ये मोठ्या पावसाला प्रारंभ झाला. ऑगस्टच्या मध्यापासून पूरपरिस्थिती सुरू झाली ती आजघडीलाही कायमच आहे. प्रादेशिक हवामान विभागाकडून दिलेले अंदाज पाहता आगामी काही दिवसातही ही स्थिती कायम राहिल, अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे प्रकल्पाबाबतची आवश्यक ती खबरदारी संबंधित यंत्रणेकडून वेळीच का घेतली नाही, ऐन महापुरात दुरुस्तीचे काम करणे किती धोकादायक होते. हा धोका केवळ दुरुस्तीपुरताच नव्हता तर संपूर्ण शहराला, गोदावरी नदीकाठच्या शेकडो गावांना वेठीस धरण्यासारखाच होता. त्यामुळे अशा गंभीर परिस्थितीला जबाबदार कोण..? हाच प्रश्न पुढे आला आहे. पण त्याचवेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या धाडसामुळे व कौशल्यामुळे नांदेड जिल्हा एका मोठ्या आपत्तीपासून वाचला आहे. या निर्णायक आणि तातडीच्या कारवाईमुळे महापुराचे पाणी नियोजनबद्ध पद्धतीने सोडण्यात आले. त्यामुळे बॅकवॉटरची समस्या निर्माण झाली नाही. हजारो एकर शेती पाण्याखाली जाण्यापासून वाचली. अन्यथा गोदावरीच्या काठावरील अनेक गावे व शेती पूर्णपणे जलमय झाली असती. २५ वर्षांनंतर आलेल्या एवढ्या प्रचंड महापुराच्या वेळी विष्णूपुरी प्रकल्पाची भूमिका अतिशय निर्णायक ठरली. या यशस्वी पुरनियंत्रणामुळे मोठा अनर्थ टळला.