
नांदेड – नांदेडमध्ये एका तरुणाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक ९ मिनिटांचा व्हिडिओ प्रसारित करून नांदेड पोलिसांची बदनामी केल्याप्रकरणी शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्नेहनगर येथील भुषण दत्तात्रय शेळके, वय ३० वर्षे याने १८ जुलै ते २४ जुलै या कालावधीत आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर स्वतःचा ०९.११ मिनिटाचा व्हिडीओ प्रसारीत केला. एका वादानंतर प्रसारित केलेल्या सदर व्हिडीओमध्ये शेळके याने नांदेड पोलीसांची बदनामी करून जनमाणसात नांदेड पोलीसांची प्रतिमा मलिन होवून जनतेमध्ये पोलीसांविषयी अप्रतिची भावना पसरविण्याच्या उद्देशाने बोलत असल्याचे दिसत आहे.
याप्रकरणी पोकॉ लिंबाजी दयाराम राठोड यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिवाजीनगर ठाण्यात कलम २९६, ३५१, ३५२, ३५६ (२) बीएनएस-२०२३ कायदा सह कलम ३ पोलीस अप्रतिची भावना चेतावणे अधिनियम १९२२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक बनसोडे हे करीत आहेत.



