प्रशासकीय

तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी संजय नागमवाड यांची निवड

कार्याध्यक्षपदी संजय वारकड तर सरचिटणीसपदी मकरंद दिवाकर, कार्यकारिणीची बिनविरोध झाली निवड

नांदेड : महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी उपविभागीय कार्यालयातील नायब तहसिलदार संजय नागमवाड यांची तर कार्याध्यपदी कार्याध्यक्षपदी संजय वारकड तर सरचिटणीसपदी मकरंद दिवाकर, तहसीलदार संजय वारकड यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा सरचिटणीस म्हणून मकरंद दिवाकर यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक हॉलमध्ये ३ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेचे मुख्य सल्लागार किरण अंबेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा शाखेची बैठक घेण्यात आली. या बैठकीत निवृत्त नायब तहसीलदार व पदोन्नत नायब तहसीलदार यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर
संघटनेचे विभागीय सचिव मुगाजी काकडे यांच्या अध्यक्षतेखाली नांदेड जिल्हा शाखेची नवीन कार्यकारणीची निवड करण्यात आली.

नवीन कार्यकारणीत जिल्हाध्यक्षपदी नायब तहसीलदार संजय नागमवाड, कार्याध्यक्ष तहसीलदार संजय वारकड, सचिव मकरंद दिवाकर, संघटक नंदकुमार भोसीकर, मंजूषा भगत, उपाध्यक्ष रामेश्वर गोरे, नयना कलकर्णी, कोषाध्यय सुनिल माचेवाड, सहसचिव सतिष जोहरे, हयूम पठाण, सल्लागार विठ्ठल परळीकर, निमंत्रीत सदस्य नायब तहसिलदार स्वप्नील दिगलवार आदींची नवनियुक्त कार्यकारिणीत बिनविरोध निवड करण्यात आली.

या निवडीबद्दल महसूल कर्मचारी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष लक्ष्मण नरमवार, नायब तहसिलदार संघटनेचे मुख्य सल्लागार किरण अंबेकर, विभागीय सचिव मुगाजी काकडे, नायब तहसीलदार नितेशकुमार बोलेलु, भगवान हंबर्डे आदींनी नवनियुक्त जिल्हा कार्यकारिणीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!