
नांदेड : नांदेड जिल्ह्यातील महाविहार बावरीनगर, दाभड येथे अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेला पौष पौर्णिमेला सोमवारी सकाळी धम्म ध्वजारोहणाने प्रारंभ झाला. १३ व १४ जानेवारी रोजी अशी दोन दिवस ही बौद्ध धम्म परिषद सुरू राहणार आहे. ‘भारतीय बौद्ध ज्ञानालंकार शिक्षण संस्था मुळावा’ चे संस्थापक अध्यक्ष पू. भदंत धम्मसेवक महास्थवीर यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद होणार आहे.
आज १३ जानेवारी रोजी सकाळी ५:३० ते ६:३० वा त्रिरत्न वंदना, परित्राण पाठ ८:३० वा महाबोधि वंदना, ९:३० वा धम्म ध्वजारोहण झाले. सकाळी ९:४० पासून धम्म उपदेशाला प्रारंभ झाला आहे. दुपारी ठीक २ वा. महात्मा ज्योतिबा फुले पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत धम्मयान संचलन, सायं. ६.०० वा बुद्ध रुपाची प्रतिष्ठापना समारंभ होईल. आज सायंकाळी ठीक सात वाजता ३८ व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेच्या उदघाटन समारंभास सुरुवात होईल. त्यानंतर धम्म देसनेस प्रारंभ होईल.
परिषदेच्या दुसर्या दिवशी म्हणजेच १४ जानेवारी रोजी सकाळी ९.०० ते ११.३० दरम्यान वधू – वर परिचय मेळावा व ११.३० वा सामूहिक मंगल परिणय विधी, ११.३० ते १२.३० व्यसन मुक्ती प्रतिज्ञा, १२.३० वा धम्म ज्ञान परीक्षा प्रमाणपत्र वितरण, दुपारी १ पासून रात्री १० वाजेपर्यंत पूजनीय भिक्खु संघातर्फे निरंतर धम्मदेसना होईल.
जनतेने शुभ्र वस्त्र परिधान करत अधिकाधिक संख्येत सहभागी होऊन धम्म श्रवणाने लाभान्वित होण्याचे आवाहन धम्म परिषदेचे संयोजक महाउपासक डॉ. एस. पी. गायकवाड यांनी केले आहे.
या दोन दिवसीय अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेत भिक्खु अतुरालीय रतन थेरो, भिक्खु नेलुवेल आनंद थेरो, भिक्खु कोनगहदिनिये पलित थेरो, भिक्खु पुत्तलमे दियसेन थेरो, व इतर आठ भिक्खु तथा थायलंड या देशातून फ्रा येन्वीन थेरो, भिक्खु लकी, भिक्खु नऱ्ओंग तसेच जपान व दक्षिण कोरिया येथील भिक्खु गण, त्याचप्रमाणे भारतातून भिक्खु खेमधम्मो महाथेरो (मुळावा जि. यवतमाळ), भिक्खु महापंथ महाथेरो (नागपूर), भिक्खु बोधिपालो महाथेरो ( छ. संभाजीनगर ), भिक्खु विशुद्धानंद महाथेरो(बुद्धगया), भिक्खु प्रज्ञादीप महाथेरो-महासचिव अ. भा. भिक्खु संघ बुद्धगया, भिक्खु डॉ. ज्ञानदीप महाथेरो(नागपूर), भिक्खु डॉ. एम. सत्यपाल थेरो, भिक्खु ज्योतिरत्न थेरो (नागपूर), भिक्खु एस. काश्यपायन थेरो (जयसिंगपूर), भिक्खु विणयबोधिप्रिय थेरो, भिक्खु धम्मानंद थेरो (बिदर), भिक्खु महाविर्यो (अहमदपूर), भिक्खु ज्ञानरक्षित (छ. संभाजीनगर), भिक्खु धम्मशील (सारनाथ), भिक्खु बुद्धदत्त (बेंगलोर) आदी देश विदेशातील विद्वान भिक्खु सदर परिषदेमध्ये संमिलित होणार आहेत.