प्रशासकीय

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची निवडणूक नियोजित वेळापत्रकानुसारच होणार 

गुरुवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेदरम्यान मतदान, नऊ जागांसाठी ४१ उमेदवार रिंगणात

नांदेड – महाराष्ट्र वैद्यकीय  परिषदेची निवडणूक नियोजित वेळापत्रकाप्रमाणेच ३ एप्रिल रोजी होणार आहे. या निवडणुकीत गुरुवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेदरम्यान मतदान होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने SLP No.८५७६/२०२५ या याचिकेमध्ये विद्यमान निर्वाचन अधिका-यांऐवजी नवीन निर्वाचन अधिकारी तात्काळ नियुक्त केल्यास निवडणूक प्रक्रिया पुढे सुरू ठेवता येईल, असे निर्देश दिनांक २ एप्रिल २०२५ च्या आदेशान्वये दिले आहेत. सदर आदेश विचारात घेता महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या निवडणुका घेण्याकरीता वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, मंत्रालयातील अवर सचिव सुनिलकुमार धोंडे  यांची नियुक्ती निर्वाचन अधिकारी म्हणून करण्यात आली आहे.

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या निवडणुकीसाठी ४१ उमेदवार निवडणूक लढवत असून त्यापैकी ९ सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. महाराष्ट्र वैद्यकीय निवडणूक-२०२५ च्या अनुषंगाने सर्व नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांना कळविण्यात येत आहे की, महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची निवडणूक नियोजित वेळापत्रकानुसारच म्हणजेच गुरुवार दि. ३ एप्रिल २०२५ रोजी होणार आहे. सर्व नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांनी मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!