क्राईम

हडकोत वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीची हॉस्टेलमध्ये आत्महत्या

हॉस्टेलला कोणत्याही विभागाची परवानगी नसल्याची माहिती आली पुढे, युवतीच्या आत्महत्येचे कारणही अस्पष्ट, नातेवाईकांनी केली मुलीच्या छळाची तक्रार

नांदेड – हडको येथील शामराव कदम होमिओपॅथिक कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या वाजेगाव येथील आकांक्षा गायकवाड या मुलीने हडको येथील वसतीगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. वैद्यकीय क्षेत्रामध्ये शिक्षण घेणाऱ्या तरुणीचा जीव गेलेला आहे. घटनास्थळी नांदेड ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल झाला नाही.
हडको भागामध्ये राष्ट्रवादीचे नेते असलेल्या जीवन घोगरे पाटील यांनी आपल्या राहते घरामध्ये अनधिकृतपणे ४० ते ५० मुलींचे अनधिकृत हॉस्टेल सुरू केले आहे. यासाठी त्यांनी कोणतीही परवानगी घेतली नाही. सदर ठिकाणी मुलींची काळजी घेण्यासाठी, देखरेख करण्यासाठी कोणतीही महिला वार्डन ठेवली नाही. चाळीस ते पन्नास मुली राहत असूनही त्या ठिकाणी कोणतेही रजिस्टर मेंटेन केले जात नाही. भेटायला कोण येते, कोण जाते, रूममध्ये कोण येत आहे, जात आहे. मुलींच्या सुरक्षेबाबत कोणत्याही उपाययोजना नाहीत. मुली कॉलेजमधून कधी येतात, केव्हा जातात गावी केव्हा जातात, सुट्टीवर केव्हा जातात, शॉपिंगला केव्हा जातात याबाबत कोणतेही इन आऊट रजिस्टर ठेवले नाही.
राजकीय वलयाचा फायदा घेऊन राजकीय दडपशाहीखाली अवैधपणे मुलीचे हॉस्टेल विना सुविधा, विनासुरक्षा चालविले जात आहे. त्यामधूनच आज एक वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीने आत्महत्या केलेली आहे. प्रत्येक मुलीकडून महिन्याला अडीच हजार रुपये फीस घेतली जाते; मात्र मुलींना कोणतीही सुरक्षितता किंवा सुविधा दिली जात नाही. अवैधपणे एका खोलीमध्ये ५-६ व एका ब्लॉकमध्ये १० ते १२ मुली कोंबून ठेवलेल्या दिसत आहेत. प्रत्येक रूममध्ये अवैधपणे गॅस ठेवलेला आहे. निष्काळजीपणे त्याचा वापर केला जातो; मात्र सुरक्षेसाठी कोणतेही अग्निशामक यंत्र ठेवलेले नाही. अनेक मुलींनी यापूर्वी पण वस्तीगृहातील सुरक्षा संदर्भात व वागणुकीसंदर्भात तक्रारी केल्या आहेत. वेळेमध्ये जर मुलींनी फीस दिली नाही तर त्यांना त्रास देणे, कॉलेजला जाऊ न देणे, कोंबून ठेवणे असेही प्रकार या ठिकाणी झाल्याचे आजूबाजूचे लोक सांगतात.
राष्ट्रवादीचे जीवन पाटील घोगरे व त्यांच्या पत्नी सदरचे अवैध हॉस्टेल चालवत असले तरी त्यांच्याबाबत तक्रार करण्याची कोणाची हिंमत होत नाही. आपण एका मोठ्या राजकीय पक्षाचे राज्यस्तरीय पुढारी आहोत. आपले कोणी काही करू शकत नाही म्हणून ते वावरत असतात. राजकीय पुढार्‍याच्या घरी रोजच कार्यकर्ते दिवस रात्र येत राहतात. त्यातच या हॉस्टेलच्या मुली त्यांच्याच गेटमधून जात असतात. अनेक वेळा राजकीय कार्यकर्त्यांच्या येण्या जाण्याचा, कशाही वागण्याचा मुलीला त्रास होत असतो.
सदर प्रकरणी शिक्षण विभाग, महानगरपालिका, पोलीस प्रशासन काय कारवाई करते याकडेही लक्ष आहे.
हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलींकडून फक्त फीस घेतली जाते. त्याची पावती मात्र त्यांना दिली जात नाही. मुलींचे कोणतेही प्रवेश अर्ज भरून घेतलेले नाहीत. मुलींच्या हालचालीच्या नोंदी ठेवणारे रजिस्टर ठेवले नाही. त्या ठिकाणी कोणतेही कर्मचारी वार्डन महिला सुरक्षेच्या दृष्टीने ठेवलेले नाही. अवैध होस्टेल चालवणाऱ्या राजकीय पुढार्‍यास व सर्व प्रॉपर्टीज यांच्या नावाने आणि जे पैसे गोळा करतात त्यांच्या पत्नीस तात्काळ अटक करून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुण केलेल्या आत्महत्येस न्याय द्यावा, ही मागणी नातेवाईकाकडून होत आहे.

या घटनेमुळे नांदेड शहरातील अनधिकृत हॉस्टेलचा मुद्दा पुन्हा एकदा पुढे आला आहे. मोठ्या प्रमाणात अनेक राजकीय मंडळी तसेच व्यावसायिक मंडळींनी अवैधरित्या हॉस्टेल सुरू केले आहेत. या हॉस्टेलला कोणत्याही विभागाची परवानगी घेतली नसल्याची बाब पुढे आली. नांदेड शहरातील एका हॉस्टेलला लागलेल्या आगीनंतर महापालिकेने शहरातील हॉस्टेलची नोंद घेणे सुरू केले होते; मात्र ती मोहिमही आता ठप्प झाली. नांदेड शहर शैक्षणिक हब होत असल्याचा फायदा घेत शिक्षणासाठी येत असलेल्या विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात लूटही नांदेडमध्ये सुरू आहे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!