
नांदेड – दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील ९२४ किलोमीटर अंतराचे विद्युतीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. नुकत्याच मीटर गेजमधून ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित झालेल्या रेल्वे लाईन्स वगळता नांदेड विभागातील पूर्वीच्या ब्रॉडगेज रेल्वे लाईन्सचे संपूर्ण विद्युतीकरण झाले असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातून देण्यात आली आहे.
मनमाड – मुदखेड – ढोणे विद्युतीकरण प्रकल्पातील शेवटचा उर्वरित विभाग ९२४ किमी अंतराचे काम पूर्ण झाले आहे. मिरखल-मालटेकडी विभागातील ४३ किमी अंतराचा शेवटचा उर्वरित भाग आता विद्युतीकरण करण्यात आला आहे.
मिशन इलेक्ट्रिफिकेशनच्या दिशेने मोठा जोर देत, दक्षिण मध्य रेल्वेने युद्धपातळीवर आपल्या संपूर्ण ब्रॉडगेज रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून मनमाड – मुदखेड – ढोणे प्रकल्प परिमंडळाने यशस्वीपणे पूर्ण केला आहे. या प्रकल्पाचा एक भाग म्हणून मिरखेल-मालटेकडी दरम्यान ४३.३ किलोमीटर अंतराच्या अंतिम नॉन-इलेक्ट्रीफाइड रेल्वे लाईनचे विद्युतीकरण करण्यात आले आहे. ९३४ किमी विद्युतीकरण प्रकल्पाच्या या अंतिम टप्प्याच्या पूर्ततेमुळे, महाराष्ट्र राज्यातील नांदेड विभागाने एक मैलाचा दगड गाठला आहे. कारण अलीकडेच ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित झालेल्या रेल्वे लाईन्स वगळता पूर्वीच्या ब्रॉडगेज रेल्वे लाईन्सचे १०० % विद्युतीकरण झाले आहे.
तेलंगणातील प्रकल्पाची लांबी धर्माबाद कुर्नूल सिटी (मनोहराबाद – महबूबनगर वगळून) दरम्यान अंदाजे ४०६ किमी आहे, ५४ किमी अंतरासाठी कुर्नूल ढोणे दरम्यानचा विभाग आंध्र प्रदेशात येतो. मनमाड – मुदखेड मधील विभाग हा मराठवाडा विभागात येतो आणि ४०६ किलोमीटर अंतराचा महाराष्ट्र राज्याचा भाग आहे. गाड्यांची अखंडित हालचाल सुलभ करून हा संपूर्ण प्रकल्प आता यशस्वीरीत्या पूर्ण झाला आहे. हे दक्षिण मध्य रेल्वेमधील सेंट्रल ऑर्गनायझेशन फॉर रेल्वे इलेक्ट्रिफिकेशन (CORE) द्वारे केले जात असलेल्या सर्व रेल्वे प्रकल्पांचे संपूर्ण विद्युतीकरण पूर्ण झाले आहे.
रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण ट्रॅक्शन पॉवर बदलणे टाळून गाड्यांची अखंड हालचाल करण्यास मदत करते. यामुळे कोचिंग आणि मालवाहतूक दोन्ही गाड्यांचा खोळंबा कमी होतो. ज्यामुळे गाड्यांच्या सरासरी वेगात सुधारणा होते.
- दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत मनमाड – मुदखेड – ढोणे विभाग हा देशाच्या पश्चिम भागांना देशाच्या दक्षिण भागाशी जोडणारा मराठवाडा विभागातील महत्त्वाचा रेल्वे मार्ग आहे. हा विभाग मराठवाडा विभागाला पश्चिमेला आर्थिक राजधानी मुंबईशी, दक्षिणेला हैदराबाद, बंगळुरू आणि चेन्नई यासारखी महत्त्वाची शहरे आणि पूर्वेला नागपूर आणि बिलासपूरशी जोडतो. त्याचे महत्त्व लक्षात घेऊन मनमाड मुदखेड – ढोणे विद्युतीकरण प्रकल्पाचा भाग म्हणून मनमाड – मुदखेड विभागाच्या विद्युतीकरणासाठी मंजुरी देण्यात आली होती.हा प्रकल्प २०१५-१६ मध्ये ८८३ किलोमीटर अंतरासाठी ८६५ कोटी रुपये खर्चून मंजूर करण्यात आला होता. संपूर्ण विभागाचे विद्युतीकरण वेगवेगळ्या भागात सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पात महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशचा समावेश आहे आणि तो वेगवेगळ्या टप्प्यात राबवला जात आहे.