शैक्षणिक

नांदेड जिल्ह्याचा शालांत परीक्षेत ९४ टक्के निकाल 

मुलींचा ९४ टक्के तर मुलांचा ९२ टक्के निकाल 

नांदेड – इयत्ता दहावीचा ऑनलाईन निकाल २७ मे रोजी दुपारी जाहीर करण्यात आला. नांदेड जिल्ह्याचा निकाल दहावीचा एकूण ९३.९९ टक्के लागला आहे. यामध्ये मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९६.०१ टक्के इतके आहे तर मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९२.१८ टक्के इतके आहे. त्यामुळे बारावी परीक्षेप्रमाणे दहावी परीक्षेतही मुलींनीच बाजी मारल्याचे स्पष्ट होत आहे.

नांदेड जिल्ह्यात इयत्ता दहावीसाठी ४५ हजार ६१६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ४५ हजार ६९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मुलांची संख्या २३ हजार ७८६ तर मुलींची संख्या २१ हजार २८३ इतकी होती. आज सोमवारी दुपारी लागलेल्या ऑनलाइन निकालामध्ये जिल्ह्यातील ४२ हजार ३६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये २१ हजार ९२८ मुले उत्तीर्ण झाले तर २० हजार ४३४ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.

सर्वाधिक ९८ टक्के निकाल मुखेड तालुक्याचा तर सर्वात खालच्या क्रमांकावर हिमायतनगर तालुका…दहावी परीक्षेत सर्वाधिक ९८.४० टक्के निकाल हा मुखेड तालुक्याचा लागला आहे. तालुक्यातील ३ हजार ५०२ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यामध्ये ३ हजार ३८३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ९६.६० टक्के निकाल बिलोली तालुक्याचा लागला आहे. तसेच ९६.५७ निकाल नायगाव तालुक्याचा लागला आहे. नांदेड तालुक्याचा ९३.२०, अर्धापूर ९५.३१, भोकर ९२.३०, देगलूर ९४.८८, धर्माबाद ९३.४२, हदगाव ९०.९० कंधार ९६.४८, किनवट ९२.३७, लोहा ९५.७८, माहूर ८७.५६, मुदखेड ९०.५१ टक्के आणि उमरी तालुक्याचा निकाल ९३.७६ टक्के लागला आहे. जिल्ह्यात सर्वात कमी ८६.८५ टक्के निकाल हा हिमायतनगर तालुक्याचा लागला आहे.  हिमायतनगर तालुक्यातील १ हजार १४१ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यातील ९९१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!