क्राईम

नांदेडमध्ये मालेगाव रस्त्यावरील ‘वागदरा’ हॉटेलवर पोलिसांची धाड 

७ महिलांसह १० ते १२ पुरुष ग्राहक ताब्यात, सहायक पोलीस अधीक्षक सी. एम. किरितीका यांची कारवाई 

नांदेड – नांदेड शहरातील मालेगाव रस्त्यावर असलेल्या हॉटेल वागदरा येथे सहायक पोलीस अधीक्षक सी. एम. किरीतीका यांच्या पथकाने धाड टाकून सात महिलांसह दहा ते बारा पुरुष ग्राहक ताब्यात घेतले आहेत. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

शहरातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय सुरू आहेत. त्यामध्ये देह व्यापाराचाही समावेश आहे. या व्यवसायात अनेक महिलांचा समावेश असल्याची बाब पोलीस तक्रारीमध्ये समाविष्ट आहे. काही रकमेच्या अमिषापोटी महिलांना या व्यवसायात ओढले जातात. अनेक स्थानिक नागरिक अशा या अवैध व्यवसायाबाबत स्थानिक पोलिसांना माहिती देत असतात. मात्र कारवाईबाबत ठाणे अधिकारी उदासीनच असतात.  मात्र शहरातील मालेगाव रस्त्यावरील हॉटेल वागदरा येथे देह व्यापार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याबाबत पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्यासह शहर उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहायक पोलीस अधीक्षक सी.एम. कीरितिका यांच्याकडे तक्रार प्राप्त झाली. या तक्रारीवरून पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी सहायक पोलीस अधीक्षक सी. एम. किरीतिका यांनी हॉटेल वागदरा येथे धाड टाकली. या धाडीत सात महिलांसह दहा ते बारा पुरुष सापडले आहेत. या प्रकरणात भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अधिक माहितीसाठी भाग्यनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास शेंडगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अधिक माहिती देण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे भाग्यनगर पोलिसांच्या सहकार्यानेच हा प्रकार सुरू होता की काय अशी शंका उपस्थित होत आहे. वरिष्ठ अधिकारीही त्या अनुषंगाने चौकशी करीत आहेत.

भाग्यनगर ठाणे हद्दीत अनेक ठिकाणी असे प्रकार सुरू आहेत. मात्र भाग्यनगर पोलिसांकडून कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात असल्याची तक्रार अनेक नागरिकांनी केली. अखेर वरिष्ठांच्या आदेशानंतर आणि सहायक पोलीस अधीक्षक यांनाच कारवाईसाठी पुढे यावे लागले आहे. त्यामुळे आता भाग्यनगर पोलीस ठाणे प्रमुखाविरुद्ध पोलीस अधीक्षक काय कारवाई करतील याकडेही लक्ष लागले आहे. दरम्यान, या कारवाईनंतर पोलिसांनी अधिक माहिती मिळाल्यानंतर आमदार नगरातही अशीच कारवाई केल्याची माहिती मिळत आहे या ठिकाणीही काही मुली आणि ग्राहक ताब्यात घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!