प्रशासकीय

नांदेडमध्ये सात पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह प्रदान

जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात झाला सन्मान सोहळा


नांदेड – पोलीस महासंचालक मुंबई यांच्याकडून जाहीर  झालेले सन्मानचिन्ह पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना आज महाराष्ट्र दिनी  पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

पोलीस महासंचालकांचे सन्मानपदक जाहीर झालेले नांदेड येथील दहशतवाद विरोधी पथकातील दिलीप पुनमचंद जाधव नांदेड, वाचक शाखेचे पंढरीनाथ मुदीराज, नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनचे  विक्रम बालाजीराव वाकडे,  नांदेड पोलीस मुख्यालयातील संतोष विश्वनाथ सोनसळे, एटीबी नांदेडचे मो. असलम मो. हनिफ,  नांदेड येथील नागरी हक्क संरक्षण विभागाचे सिद्धार्थ पुरभाजी हटकर आणि नांदेड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे दिनेश पारप्पा वसमतकर यांना  पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देवून सन्मानित करण्यात आले. या सन्मान सोहळ्यात अपर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, सहायक पोलीस अधीक्षक कीरितिका सी. एम. आदींची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!