
नांदेड – नांदेड शहरापासून जवळच असलेल्या झरी येथील खदानीत पोहण्यासाठी गेलेल्या चार तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. सुदैवाने एक तरुण बचावला आहे. सर्व तरूण हे १८ वर्ष वयोगटातील आहेत.
मंगळवारी सकाळी जुन्या नांदेडातील इतवारा आणि खुदबईनगर येथील पाच तरुण मित्र झरी येथील खदानीत पोहण्यासाठी उतरले. यातील तिघांना पोहणे येत नसल्याची बाबही पुढे आली आहे. त्यामुळे पोहत असताना एकमेकांना वाचविण्यात चौघेजण बुडाले. काझी मोजमिल, आफन, सय्यद सिद्दीकी आणि शेख फुझायल अशी मृतांची नावे आहेत. महमद फैजान हा बालंबाल बचावला आहे. हे सर्वच तरुण १८ वर्ष वयोगटातील आहेत.
सदरील घटनेची माहिती पोलीस, गोदावरी जीवरक्षक दल आणि नांदेड महापालिका अग्निशमन दलाला कळवण्यात आली. तात्काळ नांदेड मनपा अग्निशमन दलाचे जवान, गोदावरी जीवरक्षक दलाने शोध मोहीम सुरू केली. दुपारी दीड वाजेच्या खदानीतून चार तरुणांचे मृतदेह बाहेर काढले. घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, इतवारा उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांनी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. झरी खदानीतून या तरुणांचे मृतदेह बाहेर काढल्यानंतर शवविच्छेदनासाठी विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहेत.
घटनेबाबत अपर पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी अधिक माहिती दिली…