अपघात

बारडजवळील अपघात चालकाचे नियंत्रण सुटल्याने इनोवा कार थेट कॅनॉलमध्ये…

एकाच कुटुंबातील पाचजण जखमी, एका महिलेची प्रकृती गंभीर हैदराबादला हलविले

नांदेड – महालक्ष्मी सणानिमित्त गावाकडे जाऊन पूजा आटोपून एका कुटुंबातील ५ जण नांदेडकडे परतत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने इनोवा कार थेट कॅनॉलमध्ये कोसळल्याची घटना रविवारी दुपारी दीडच्या सुमारास मुदखेड तालुक्यातील बारडजवळ घडली. या अपघातात पाचजण जखमी झाले आहेत. या घटनेतील जखमी झालेल्या एका महिलेची प्रकृती गंभीर आहे. सदरील महिलेला पुढील उपचारासाठी हैदराबादला हलविण्यात आले आहे.

नांदेड येथील कंठाळे कुटुंबीय आपल्या मूळ गावी हदगाव तालुक्यातील येवली येथे महालक्ष्मी सणानिमित्त शुक्रवारी गेले होते. महालक्ष्मी सण ऑटोपून हे सर्वजण आज रविवारी दुपारी येवलीहून निघाले. यावेळी दीडच्या सुमारास ते मुदखेड तालुक्यातील बारडनजीक पोहोचले असता भरधाव वेगातील त्यांची कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने अचानक कॅनॉलमध्ये कोसळली. या अपघातात इनोवा कारमधील शिवाजी विश्वनाथ कंठाळे वय ७५, अनुराधा शिवाजी कंठाळे वय ६५, नागेश अशोक कंठाळे वय ३५, प्रणिता नागेश कंठाळे वय ३० आणि परी नागेश कंठाळे वय ९ वर्ष हे जखमी झाले.

घटनास्थळी उपस्थितांनी जखमींना तातडीने कारमधून बाहेर काढले. त्यांना उपचारासाठी बारड येथील ग्रामीण रुग्णालयात नेले; मात्र तेथे डॉक्टर नसल्याने त्यांच्यावर उपचार करता आले नाहीत. परिणामी त्यांना नांदेड येथे एका खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. या अपघातातील जखमी शिवाजी कंठाळे यांचे दोन्ही पाय तुटले आहेत. इतर तिघांवरही उपचार सुरू आहेत. यातील प्रणिता कंठाळे वय ३० या महिलेची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी हैदराबादला हलविण्यात आले आहे. या कोणतीही नोंद नसल्याचे बारड पोलीस ठाणे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!