
नांदेड – नांदेड महापालिकेचे आयुक्त तथा पुण्याचे विभागीय आयुक्त तसेच मुख्यमंत्र्यांचे सल्लागार म्हणून काम पाहिलेले नांदेडचे भूमिपुत्र डॉ. दीपक म्हैसकर यांची पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने राज्यस्तरीय पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. यामध्ये सुधाकर नांगनुरे हे सदस्य म्हणून काम पाहणार आहेत. राज्याच्या पर्यावरण तथा जलवायू परिवर्तन विभागाचे प्रधान सचिव या समितीचे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत. समितीच्या अध्यक्षपदाची मोठी जबाबदारी डॉ. म्हैसेकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. अध्यक्ष पदाची ही नियुक्ती तीन वर्षाच्या कार्यकालासाठी करण्यात आली आहे. केंद्र शासनाने नियुक्त केलेली ही समिती राज्यात पर्यावरण संरक्षणासाठी विविध उपाययोजना तसेच पर्यावरण संरक्षणासाठी काम करणार आहे.
या समिती सोबतच केंद्र सरकारने इतर तीन समित्याही गठीत केल्या आहेत. या समितीच्या अध्यक्ष आणि सदस्यांची घोषणाही या आदेशाद्वारे करण्यात आली आहे.