नांदेड – होणार..होणार.. अशा चर्चा सुरू असतानाच आता नांदेडकरांसाठी आनंदाची बातमी मिळाली आहे. मुंबई – नांदेड – मुंबई हे विमानसेवा येत्या २५ डिसेंबरपासून सुरू होत आहे. स्टार एअर कंपनीची ही विमान सेवा असणार आहे. स्टार कंपनीच्या वेबसाईटवर बुकिंगही सुरू झाली आहे. त्यामुळे आता मुंबईसाठी नांदेडकरांना थेट उड्डाण घेता येणार आहे. पण त्याचवेळी गोव्याला विमानाने जाण्यासाठी उत्सुक असलेल्या प्रवाशांना आणखी प्रतीक्षाच करावे लागणार आहे.
बहुप्रतिक्षित नांदेड – मुंबई विमानसेवेमुळे आता नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, वाशिम, हिंगोली अशा सर्व जिल्ह्यातील प्रवाशांना या विमानसेवेचा लाभ घेता येणार आहे. मुंबई – नांदेड – मुंबई विमानसेवा येत्या २५ डिसेंबरपासून सुरू होत आहे. स्टार एअर कंपनीच्या वेबसाईटवर बुकिंग सुरू झाली आहे. ही विमानसेवा नोव्हेंबरमध्येच नियोजित होती. मात्र तांत्रिक कारणांमुळे त्यास विलंब झाल्याची माहितही पुढे आली आहे.
नांदेड – मुंबई विमानसेवा सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री के. राममोहनजी नायडू, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधरजी मोहोळ यांचे सहकार्य लाभल्याचे सांगत माजी मुख्यमंत्री, खा. अशोकराव चव्हाण यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.