
विधानसभेसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २९ ऑक्टोबर आहे. नांदेड जिल्ह्यात नऊ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामध्ये नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, भोकर, लोहा, किनवट, हदगाव, देगलूर, मुखेड आणि नायगाव विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. नांदेड उत्तर मतदारसघात ४१ उमेदवारांनी ६७ अर्ज नेले आहेत. भोकर विधानसभा मतदारसंघात ६२ इच्छूकांनी ६९ अर्जाची उचल केली आहे. लोहा मतदारसंघात ७ इच्छूकांनी १७ अर्ज, किनवट मतदार संघात १६ इच्छूकांनी ४४ अर्ज, हदगाव मतदारसंघात ३६ इच्छूकांनी ७२ अर्ज, नांदेड दक्षिण मतदार संघात २१ इच्छूकांनी ३१ अर्ज, देगलूर मतदारसंघात १७ इच्छूकांनी ३९ अर्ज, मुखेड विधानसभा मतदारसंघात १७ इच्छूकांनी ३८ अर्ज आणि नायगाव मतदारसंघात ३८ इच्छूकांनी ६४ अर्ज घेतले आहेत. दुसऱ्या दिवशी किनवट १, भोकर २, नांदेड उत्तर १ या तीन मतदार संघातील इच्छूकांनी विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी दाखल केली आहे.
विधानसभेसाठी अर्ज दाखल करणारे उमेदवार… नांदेड उत्तरमध्ये अकबर अख्तर खान यांनी एक अर्ज दाखल केला. किनवटमध्ये अर्जुन किशन आडे यांनी एक तर भोकरमध्ये अब्दुल वाहिद मोहमद यांनी दोन अर्ज दाखल केले आहेत. लोकसभेसाठी एकही अर्ज दाखल नाही… लोकसभा पोटनिवडणुकीसाठी बुधवारी दुसऱ्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नाही. १७ अर्जदार व्यक्तींनी जवळपास २८ अर्जाची उचल केली आहे.