नांदेड – आगामी काळातील अतिमहत्वाचे व्यक्तीचे डौलात निवडणूक बंदोबस्त तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नांदेड जिल्हा पोलीस दलासाठी जिल्हा नियोजन समितीकडून वाहने खरेदी करण्यासाठी निधी उपलब्ध झाल्याने ३९ नवीन वाहने खरेदी करण्यात आले आहेत.
पोलीस दलासाठीसदर ३९ वाहनात २२ निओ बोलेरो, १५ स्कॉर्पिओ व ०२ महिंद्रा थार ही वाहने खरेदी करण्यात आले. सदर वाहने खरेदी करण्याकरीता जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी डीपीडीसीमधून निधी उपलब्ध करून दिला आहे. यातील २२ वाहनाचे पोलीस मुख्यालय नांदेड येथे नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांचे हस्ते सदर वाहनांना हिरवा झेंडा दाखवून पोलीस कर्तव्याकरीता रवाना करण्यात आले. ही वाहने उपलब्ध झाल्याने पोलीस विभागाची मोठी अडचण दूर झाली आहे.
सदर कार्यक्रमाचे नियोजन एमटीओ पोलीस निरीक्षक चोपडे पोलीस मुख्यालय राखीव पोलीस निरीक्षक विजय धोंडगे यांनी उत्कृष्टरित्या केले.