प्रशासकीय

नांदेड जिल्ह्यात ईव्हीएम व व्हीव्हीपॅटमधील एकाही मताचा फरक नाही – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

नांदेड लोकसभा, विधानसभेच्या ७५ केंद्रावर व्हीव्हीपॅट पडताळणी, निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे नियमित प्रक्रिया पूर्ण

नांदेड : मतमोजणी प्रक्रियेदरम्यान प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील पाच केंद्राच्या ईव्हीएम मशीनवरील उमेदवारनिहाय प्राप्त मतांची आकडेवारी ही व्हीव्हीपॅटशी जुळते का याची तपासणी केली असता जिल्ह्यातील निवडक ७५ केंद्रावरील मतांची आकडेवारी पूर्णपणे जुळली आहे. लॉटरी पद्धतीने करण्यात आलेल्या जिल्ह्यातील लोकसभेच्या ३० व विधानसभेच्या ४५ अशा एकूण ७५ केंद्राची मतमोजणी बिनचूक असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.

मतमोजणी प्रक्रियेदरम्यान भारत निवडणूक आयोगाच्या सूचनाप्रमाणे प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील पाच केंद्राच्या ईव्हीएम मशीनवरील उमेदवारनिहाय प्राप्त मतांची आकडेवारी ही व्हीव्हीपॅटशी जुळते का, याची तपासणी केली जाते. जिल्ह्यात लॉटरी पद्धतीनुसार केंद्राची निवड सर्व उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या समक्ष चिठ्ठी काढून केली जाते. तर मोजणीची प्रक्रिया निवडणूक निरीक्षकांच्या पुढे केली जाते. हे निवडणूक निरीक्षक वेगवेगळ्या राज्यातील वरिष्ठ सनदी अधिकारी असतात. प्रत्येकवेळी निवडणूक संपल्यानंतर ही प्रक्रिया पार पाडली जाते. नांदेडमध्येदेखील ही प्रक्रिया पार पाडली गेली आहे. या प्रक्रियेमागील उद्देश हा सर्व ठिकाणच्या ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मधील उमेदवार निहाय प्राप्त मतदानाची आकडेवारी अचूक असल्याची खात्री पटविण्यासाठी खातरजमा प्रक्रिया म्हणून केली जाते.मतमोजणी दरम्यान, प्रत्येक विधानसभा मतदारसंघ क्षेत्र निहाय ५ व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठया (slips ) प्रत्यक्ष मोजल्या जातात. त्यांची ईव्हीएम मशीनमधील मतांसोबत पडताळणी केली जाते. या ५ केंद्रांची निवड लॉटरी पद्धतीने सर्व उमेदवार मतमोजणी प्रतिनिधी यांचे समक्ष चिठ्ठी काढून होते. ही प्रक्रिया निवडणूक निरीक्षक यांचे समोर होते. त्यानंतर व्हीव्हीपॅट चिठठी (VVPAT slips ) मतमोजणी प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत मोजल्या जातात.

सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीसाठी नांदेड जिल्ह्यातील ९ विधानसभा मतदार संघातील प्रत्येकी ५ प्रमाणे ४५ मतदान केंद्रांची व्हीव्हीपॅट (VVPAT ) पडताळणी करण्यात आली आहे. सर्व ४५ ठिकाणी व्हीव्हीपॅट व ईव्हीएम कंट्रोल युनिट (EVM CU) यातील उमेदवार निहाय मतांची आकडेवारी पूर्णतः जुळली आहे. तसेच लोकसभा पोट निवडणुकीसाठी लोकसभेतील ६ विधानसभा क्षेत्रातील प्रत्येकी ५ प्रमाणे ३० मतदान केंद्रांसाठी व्हीव्हीपॅट पडताळणी करण्यात आली. यात सर्व ३० ठिकाणी व्हीव्हीपॅट व ईव्हीएम कंट्रोल युनिट यातील उमेदवार निहाय मतांची आकडेवारी पूर्णतः जुळली आहे.
जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघातील ज्या ठिकाणी ईव्हीएमवरील इलेक्ट्रॉनिक काउंटिंग आणि व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्या यांची मतदान संख्या तपासण्यात आली आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील ९ विधानसभा मतदारसंघात किनवट विधानसभेमधील केंद्र क्रमांक १५१ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निचपुर, २५८ धानोरा, १३ वासरामटंडा, १७५ मारेगाव खालचे, ११२ मोहडा या केंद्रांचा समावेश आहे. हदगाव विधानसभा क्षेत्रातील २८ वरुला, ११७ पळसा, १३८ वाटेगाव, २१९ कंजरा, ३३७  रोडगी येथील या मतदान केंद्रांचा समावेश आहे. भोकर विधानसभा क्षेत्रातील १३९ पाणीपुरवठा विभाग नवीन समाज मंदिर, १३७ जवाहर भवन हे भोकर शहरातील, तर ३०० नांदा बुद्रुक, २९५ खडकी, ८२ रेनापुर या  पाच केंद्रांचा समावेश आहे.
नांदेड उत्तरमध्ये ४७ पिंपरी महिपाल, २१७ किशोर नगर येथील विद्या विकास पब्लिक स्कूल मतदान केंद्र, २२५ ब्रह्मसिंग नगर, इमरान कॉलनीतील इकरा उर्दू हायस्कूल, ३१७ हैदरबागमधील एन एस डब्ल्यू स्कूलचा ३२५ समावेश आहे. नांदेड दक्षिणमध्ये २० सफा उर्दू प्रायमरी स्कूल, ३३ शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, ९९ गांधी राष्ट्रीय हिंदी विद्यालय, १५७ जिल्हा परिषद प्रायमरी शाळा पुणेगाव, २४७ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुप्पा आदी केंद्रांचा समावेश आहे. लोहा मतदार संघामध्ये २९२ धानोरा कवठा, लोहा येथील १३५ जिल्हा परिषद सी पी एस मुलींची शाळा, २४८ काटकळंबा, ६४ आलेगाव या केंद्रांचा समावेश आहे. नायगावमधील १०७ हातनी, ९७ बरबडा, २५ बितनाळ, २०७ रत्नाळी,  इकळीमोर या केंद्रांचा समावेश आहे. देगलूरमध्ये ०५ तोरणा, ०३७ बेलकुनी बुद्रुक, २९१ वलग, ३०२ मरखेल, ३२५ हनेगाव या मतदान केंद्राचा समावेश आहे. मुखेडमध्ये ७२ खैरकवाडी, ८७ बेटमोगरा, १६६ गुरुदेव विद्या मंदिर मुखेड, २६२ झेडपी प्रायमरी स्कूल किसान तांडा, ३१० झेडपी प्रायमरी स्कूल वाळंकी आदी मतदान केंद्रांचा समावेश आहे.
नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी विधानसभा क्षेत्रनिहाय तपासणी करण्यात आलेल्या मतदान केंद्रामध्ये भोकर मतदार संघातील अर्धापूर येथील केंद्र क्रमांक ४१, नागापूर येथील केंद्र क्रमांक १६१, मुखेड येथील केंद्र क्रमांक २३९ दौर येथील केंद्र क्रमांक २८७, वाडी मुक्ताजी येथील केंद्र क्रमांक ३२१ चा समावेश आहे. नांदेड उत्तरमधील राष्ट्रमाता स्कूल केंद्र क्रमांक ३५, हेरिटेज इंग्लिश स्कूल केंद्र क्रमांक ११८, ऑक्सफर्ड इंटरनॅशनल केंद्र क्रमांक १६४, उर्दू शाळा क्रमांक ३२०, कुडवाई नगर येथील माध्यमिक मुलांची शाळा ३४६ आदींचा समावेश आहे. नांदेड दक्षिणमधील वॉटर सप्लाय ऑफिस केंद्र क्रमांक ९०, निळा रोड येथील शाळा क्रमांक १४५, जिल्हा परिषद प्रायमरी शाळा वसरणी केंद्र क्रमांक १९०, कुसुमताई शाळा केंद्र क्रमांक २०७, सोनखेड येथील केंद्र क्रमांक २९३ चा समावेश आहे. नायगाव येथील बेटक बिलोली केंद्र क्रमांक २९८, गोरेगाव केंद्र क्रमांक २९२, इलेगाव केंद्र क्रमांक ५८,  कुंटूर येथील केंद्र क्रमांक १७६, सिंधी येथील केंद्र क्रमांक १२ आदींचा समावेश आहे. देगलूर मतदारसंघांमध्ये टाकळी येथील केंद्र क्रमांक २९८, इब्राहिमपूर येथील केंद्र क्रमांक १७४, कुंडलवाडी येथील केंद्र क्रमांक १८, देगलूर सेंटर मधील केंद्र क्रमांक २५०, देवपूर येथील केंद्र क्रमांक २९६ चा समावेश आहे. मुखेड मतदार संघातील श्रीरंगवाडी केंद्र क्रमांक ४२, उमरगा येथील केंद्र क्रमांक १०७, कुरुला येथील केंद्र क्रमांक ५४, घुबडवाडी येथील केंद्र क्रमांक १०२, डोरनाली येथील केंद्र क्रमांक ३०९ चा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!