
नांदेड – येथील उत्कृष्ट क्रिकेट खेळाडू सुशील सायन्ना गोपरे वय ५८ वर्ष यांचे दीर्घ आजाराने ९ एप्रिल रोजी निधन झाले. त्यांच्या पार्थिव देहावर सायंकाळी नांदेडमध्ये गोवर्धन घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
नांदेड जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यात सुशील गोपरे यांनी क्रिकेटमध्ये नाव लौकिक केले होते. एक अष्टपैलू क्रिकेट प्लेअर म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांनी रणजीपर्यंत मजल मारली होती. अनेक वर्षे ते My OWN टीमचे कर्णधार होते. त्यांची बॅटिंग बघण्यासाठी स्टेडियममध्ये तरुणाईची गर्दी राहत असे. त्यांच्या नाबाद १७५ धावा आजही नांदेडकरांच्या स्मरणात आहेत. श्रद्धांजलीच्या वेळेस अनेक मान्यवरांनी त्यांच्या जुन्या आठवणीला उजाळा दिला. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, दोन बहिणी व सौरभ, सुशांत, संचिता अशी दोन मुले आणि एक मुलगी आहे.