नांदेड – जिल्ह्यात पोलीस दलाच्या वतीने ‘मिशन सहयोग’ राबविले जात आहे. यामध्ये वेगवेगळे समाजोपयोगी आठ उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. ‘मिशन सहयोग’ मध्येच समाविष्ट असलेल्या ‘मिशन उडान’ या एका उपक्रमांतर्गत नांदेडमध्ये २ आणि ३ मे रोजी जिल्हा पोलीस मुख्यालयात भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
पोलीस दल आणि समाजामध्ये एक घनिष्ठ संबंध आहे. पोलिसांच्या कामकाज पद्धतीचा समाजावर परिणाम होत असतो. पोलीस समाजासाठी 24 × 7 कार्यरत असतात. अशावेळी दैनंदिन कामाशिवाय सामाजिक बांधिलकीचे उपक्रमही जिल्हा पोलीस दलाकडून अनेकदा राबवले जात आहेत. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या संकल्पनेतून नांदेड जिल्ह्यात ‘ मिशन सहयोग’ ची सुरुवात करण्यात आली आहे. त्यात आठ नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत. ‘मिशन सहयोग’ मध्ये ऑपरेशन बीट कनेक्ट, मिशन उडान, ऑपरेशन वारसा जतन, नांदेड पोलीस लीग, (एमपीएल), मिशन निर्भया, मिशन समाधान, मिशन निर्धार आणि मिशन एकता जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे. या उपक्रमापैकी ‘मिशन उडान’ अंतर्गत नांदेडमध्ये २ आणि ३ मे रोजी भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्याचवेळी यूपीएससी आणि एमपीएससी या स्पर्धा परीक्षा संदर्भातही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.
जिल्हा पोलीस मुख्यालयात २ आणि ३ मे रोजी होणाऱ्या या भव्य रोजगार मेळाव्यात भारतातील सर्व उद्योग क्षेत्रातील कार्यरत २५ नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. या मेळाव्यामध्ये विद्यार्थ्यांना विविध रोजगारांच्या संधी प्राप्त होणार आहेत. संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरातील प्रमुख नामांकित शहरात हे रोजगार विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहेत. इयत्ता दहावीसह, पदवी, पदव्युत्तर तसेच तांत्रिक शिक्षण पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या मेळाव्यात सहभाग घेता येणार आहे.
जिल्ह्यातील सर्व दहावी पास तसेच महाविद्यालयीन युवकांना व सुरक्षित बेरोजगारांना आपल्या सर्व शैक्षणिक कागदपत्रांसह जिल्हा पोलीस मुख्यालयात २ मे रोजी सकाळी ११ वाजता सहभाग नोंदवता येणार आहे. या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. या नोंदणीसाठी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने एक लिंक देण्यात आली आहे तसेच स्कॅनरचा वापरही बेरोजगारांना करता येणार असल्याचे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने कळविण्यात आले आहे.