
नांदेड – प्रसिद्ध सिने अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाची वार्ता येताच संपूर्ण नांदेड जिल्हा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र आणि देशातील बॉलीवूड सिनेसृष्टी स्तब्ध झाली आहे. नानांच्या सिनेक्षेत्रातील कामगिरीची, त्यांनी केलेल्या मराठी आणि हिंदी चित्रपटातील वेगवेगळ्या भूमिकांची आठवण होत असतानाच ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून त्यांनी केलेले शेतकऱ्यांसाठीचे कामही एक सामाजिक आदर्श ठरले आहे. नांदेड जिल्ह्यातील पाचशेहून अधिक आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून आतापर्यंत मदत करण्यात आली आहे. ‘नाम फाउंडेशन’च्या स्थापनेच्या प्रारंभीच नांदेडमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात स्वतः नाना पाटेकर यांनी शेतकऱ्यांना मदत दिली होती. त्यांनी शेतकऱ्यांविषयी केलेल्या कार्याच्या या आठवणी आता आठवणीच राहिल्याची प्रतिक्रिया नाम फाउंडेशनचे संघटक प्रा. बालाजी कोंपलवार यांनी दिली.
सिने कलावंत नाना पाटेकर यांचे आज गुरुवारी पहाटे गोव्यातील निवासस्थानी निधन झाले. हृदयविकाराने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्या मृत्यूनंतर आता वेगवेगळ्या क्षेत्रातून शोक व्यक्त होत आहे. त्यांची सामाजिक जाणिवही किती उच्च कोटीची होती हे ‘नाम फाउंडेशन’चे काम पाहिल्यानंतर स्पष्ट होत आहे. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मदत करावी या उद्देशाने नाना पाटेकर आणि सिने अभिनेता मकरंद अनासपुरे यांच्या पुढाकारातून ‘नाम फाउंडेशन’ची २०१५ मध्ये स्थापना झाली. ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून प्रारंभी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यात आला. संपूर्ण मराठवाड्यात ‘नाम फाउंडेशन’च्या वतीने सर्वाधिक मदत ही नांदेड आणि बीड जिल्ह्यात करण्यात आली आहे. बीड जिल्हा हा दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्याचवेळी नांदेडमध्येही आर्थिक संकटात सापडलेल्या अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना ‘नाम फाउंडेशन’ च्या माध्यमातून वेगवेगळ्या स्वरूपात मदत करण्यात आली आहे. रोख रकमेसह, शिलाई मशीन, विद्यार्थ्यांना सायकल यासह दुष्काळी भागात जलसंधारणाची कामे करून त्या भागात पाण्याची उपलब्धता करून देण्याबाबत नेहमीच प्रयत्न केला जात आहे. २०१५ मध्ये नांदेडमध्ये शेतकऱ्यांच्या मदतीसाठी झालेल्या एका कार्यक्रमात नाना पाटेकर स्वतः उपस्थित होते. नांदेड जिल्ह्यात ‘नाम फाउंडेशन’ च्या वतीने पाचशे महिलांना शिलाई मशीन तसेच ५०० विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले आहे. कोरोना काळातही ‘नाम फाउंडेशन’ च्या वतीने मोठा मदतीचा हात गरजूंना देण्यात आला. यामध्ये नांदेडचे सिने अभिनेता मकरंद अनासपुरे, जेष्ठ पत्रकार केशव घोणसे पाटील यांचा पुढाकारही महत्त्वाचा ठरला होता.
‘नाम फाउंडेशन’ चे नांदेड जिल्हा समन्वयक म्हणून किनवटचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अशोक बेलखोडे हे काम पाहतात तर संघटक म्हणून प्रा.डॉ. बालाजी कोंपलवार यांनी धुरा सांभाळली आहे. तालुका पातळीवरील ‘नाम फाउंडेशन’ चे पदाधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. यामध्ये नायगाव तालुक्यात भाऊराव मोरे यांनी ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी सातत्याने पुढाकार घेतला आहे. दुष्काळग्रस्त भागात जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात ‘नाम फाउंडेशन’च्या वतीने करण्यात आली आहेत. नांदेडही त्यामध्ये मागे नाही गेल्या. पंधरा वर्षात जवळपास १०० किमी अंतरातील गाळ काढून या भागात जल संचय कसा वाढेल, यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. त्याला चांगले यशही मिळाले आहे. मन्याड नदीतील गाळही गेल्या दोन वर्षांपूर्वीच काढण्यात आला होता. नांदेड जिल्ह्यातील होनवडज, मिनकी, खुरगाव येथील तलावही मोठे उपयुक्त ठरले आहेत. जिल्ह्यात गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीने शेतकरी संकटात आला होता. त्यावेळी जवळपास २ हजारहून अधिक शेतकऱ्यांना ‘नाम फाउंडेशन’ च्या माध्यमातून बी- बियाणे मोफत देण्यात आले. त्यातून शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला होता.
नांदेड जिल्ह्यात आता उद्भवलेल्या दुष्काळी परिस्थितीत प्रशासकीय यंत्रणांकडून जलसंधारणाची कामे हाती घेण्यात येतीलच. पण नाम फाऊंडेशनही या दुष्काळी परिस्थितीत जिल्ह्यातील अनेक कामे हाती घेण्याची तयारी करीत असल्याची माहिती नामचे जिल्हा संघटक डॉ. कोंपलवार यांनी दिली होती. याबाबत त्यांनी महात्मा गांधी जयंती दिनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, नांदेड उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांच्यासमवेत चर्चाही केली होती. जिल्ह्यातील मालगुजारी तलावातील गाळ काढून त्याचे खोलीकरण करून जलसंचय साठा वाढविण्याबाबत प्रयत्न केला जाणार होता. आता नानांच्या जाण्याने ही कामे किती प्रमाणात होतील याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. दुष्काळी परिस्थितीतील शेतकऱ्यांचा मोठा आधार गमावला असल्याचेही डॉ. कोंपलवार म्हणाले.
सिने अभिनेता नाना पाटेकर यांनी मराठी, हिंदी चित्रपटात तसेच नाटकामध्ये केलेल्या वेगवेगळ्या भूमिका या नांदेडकरांच्या स्मरणात आहेतच. त्याचवेळी त्यांनी सामाजिक जाणीवेतून शेतकऱ्यांना केलेली मदत ही सदैव त्यांच्या आठवणींना उजाळा देणारी राहणार आहे. ‘नाम फाउंडेशन’ च्या माध्यमातून हे कार्य यापुढेही चालू राहील, असा विश्वास प्रा. कोंपलवार यांनी व्यक्त केला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री, खासदार अशोकराव चव्हाण यांनीही नाना पाटेकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. यामध्ये नाना पाटेकर यांच्या निधनाचे वृत्त हे धक्का देणारे असल्याचे सांगितले नाना पाटेकर यांनी चित्रपट, नाटक यामध्ये केलेल्या भूमिका या त्यांच्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटविणाऱ्या होत्या. ते एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. ते रोखठोक भूमिका घेणारे होते. ते आपली भूमिका परखड शब्दात मांडण्यास मागेपुढे पाहत नव्हते, असेही खासदार चव्हाण म्हणाले.
सिने अभिनेता नाना पाटेकर यांनी मराठी, हिंदी चित्रपटात तसेच नाटकामध्ये केलेल्या वेगवेगळ्या भूमिका या नांदेडकरांच्या स्मरणात आहेतच. त्याचवेळी त्यांनी सामाजिक जाणीवेतून शेतकऱ्यांना केलेली मदत ही सदैव त्यांच्या आठवणींना उजाळा देणारी राहणार आहे. ‘नाम फाउंडेशन’ च्या माध्यमातून हे कार्य यापुढेही चालू राहील, असा विश्वास प्रा. कोंपलवार यांनी व्यक्त केला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री, खासदार अशोकराव चव्हाण यांनीही नाना पाटेकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. यामध्ये नाना पाटेकर यांच्या निधनाचे वृत्त हे धक्का देणारे असल्याचे सांगितले नाना पाटेकर यांनी चित्रपट, नाटक यामध्ये केलेल्या भूमिका या त्यांच्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटविणाऱ्या होत्या. ते एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. ते रोखठोक भूमिका घेणारे होते. ते आपली भूमिका परखड शब्दात मांडण्यास मागेपुढे पाहत नव्हते, असेही खासदार चव्हाण म्हणाले.


